Nana Patole : पटोलेंनी निवडून येणाऱ्या काँग्रेस आमदारांचा आकडाच सांगितला अन्..!

Nana Patole predicts Congress MLAs count in Maharashtra: '...त्यामुळे आम्ही निवडून आलेल्या आमदारांना तातडीने हलवण्याची तयारी केली आहे.' असंही पटोले यांनी म्हटलं आहे.
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी राज्यात नवे सरकार येणार आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसचा स्ट्राईक रेट सर्वाधिक राहणार आहे, असे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीपदावर काँग्रेसचाच दावा राहणार असल्याचे सांगून टाकले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे 175 आमदार निवडणूक जिंकणार आहेत. यात 75 काँग्रेसच्या आमदारांच्या समावेश राहणार आहे याकडे नाना पटोले (Nana Patole) यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्री कोणाचा राहील यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. या विषयावर आत्ताच काही बोलणे बरोबर होणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

महाविकास आघाडीतील (MVA) सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतली. हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रात गडबड होऊ नये याची खबरदारी घेतल्या जात आहे. सर्वांना अलर्ट करण्यात आले आहे. मतमोजणी संदर्भात सर्व उमेदवारांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या मतदारसंघात टफ फाईट आहे तेथे भाजप गडबड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आम्ही ते होऊ देणार नाही असेही पटोले यांनी सांगितले.

Nana Patole
Baramati Voting Percentage : बारामतीत यंदा मतदानाचा टक्का वाढला; कुणाला होणार फायदा?

एक्झिट पोलचे आकडे खरे वाटत नाही. आमच्या सर्वेनुसार महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. शुक्रवारी महाविकास आघाडीची बैठक बोलावण्यात आली आहे. आम्ही 25 तारखेला राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहोत. तरुणांनी बेरोजगारीमुळे भाजपला (BJP) नाकारले आहे. वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारी तरुणांचे मत जास्त आहे. त्यांचा कौल महाविकास आघाडीकडे आहे. यात लाडक्या बहिणींचासुद्धा समावेश असल्याचा दावा पटोले यांनी केला.

Nana Patole
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील सत्तेची चावी असणार अपक्षांच्या हाती; सोलापुरातील 'या' उमेदवारांवर असणार 'वॉच'

शनिवारी निकाल येताच महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडतील. भाजपसोबत कोणीच राहायला तयार नाही. आम्ही या सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. आमच्यापेक्षा महायुतीमध्ये भांडणे आणि स्पर्धा जास्त आहे. भाजपने राजकीय व्यवस्थेत आमदार फोडण्याची जी परंपरा आहे. त्यामुळे आम्ही निवडून आलेल्या आमदारांना तातडीने हलवण्याची तयारी केली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com