Nana Patole : नाना पटोलेंना मोठा झटका, एक संचालक फोडला अन् भंडारा दूध संघही महायुतीने...

Bhandara Milk Union Elections Mahayuti: राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नाना पटोले यांना रिकामटेकडे असे संबोधले होते. त्यामुळे चिडलेल्या नाना पटोले यांनी पटोले यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते.
Major political setback as Nana Patole’s panel loses Bhandara Cooperative Bank election; MP Prashant Padole also suffers defeat.
Major political setback as Nana Patole’s panel loses Bhandara Cooperative Bank election; MP Prashant Padole also suffers defeat.Sarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Political News: भंडारा जिल्हा दुग्ध सहकारी संघाच्या निवडणुकीत टाय झालेला सामना अखेर भाजप महायुतीने जिंकला. त्यामुळे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना गृहजिल्ह्यात पुन्हा एक धक्का बसला आहे. दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीचे सहा आणि महाविकास आघाडीचे सहा असे बारा संचालक निवडून आले होते.

त्यामुळे अध्यक्षपदासाठी मोठी चुरस निर्माण झाली होती. अध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या मतदानाच्यावेळी आघाडीचा एक संचालक अनुपस्थित राहिल्याने महायुतीचे विलास काटेखाये एक मताने निवडून आले. त्यांना सहा तर आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार विवेक पडोळे यांना पाच मते पडली.

भंडारा जिल्हा दूध संघ विदर्भातील सर्वात मोठा मानला जातो. हा संघ आपल्या ताब्यात राहावा यासाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात सहकार पॅनेल आणि काँग्रेसच्या नेतृत्वात शेतकरी पॅनेल रिंगणात होते.

एकूण १२ संचालकांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. नाना पटोले यांनी शिवसेनेचे भंडाराचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही आपल्यासोबत घेतले होते. यावरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना महायुती सोडल्याने आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावर बोचरी टीका केली होती. यावरून अनेक दिवस आरोप-प्रत्यारोप सुरू होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी नाना पटोले यांना रिकामटेकडे असे संबोधले होते.

त्यामुळे चिडलेल्या नाना पटोले यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री असताना पटोले यांच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. गोंदियाचा दूध संघ पटेल यांनी बुडवला. आता भंडारा दूध संघ त्यांना बुडवायचा असल्याचा आरोपही पटोले यांनी केला होता. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती.

Major political setback as Nana Patole’s panel loses Bhandara Cooperative Bank election; MP Prashant Padole also suffers defeat.
Ashok Chavan News : 'ऑपरेशन सिंदूर'वर अविश्वास दाखवणाऱ्या काँग्रेसला अशोक चव्हाणांकडून सडेतोड उत्तर!

मात्र दोन्ही पॅनेलचे सहा संचालक निवडून आल्याने सामना टाय झाला होता. तेव्हापासूनच अध्यक्ष कोणाचा होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महिनाभरापासून फोडाफोडीचे प्रयत्न सुरू होते.

महायुतीला एक संचालक फोडण्यात यश आले. नवनिर्वाचित अध्यक्ष विलास काटेखाये नऊ वर्षांपूर्वी दूध संघाचे अध्यक्ष होते. २०१६ मध्ये त्यांच्यावर आरोप झाल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर रामलाल चौधरी हे संघाचे अध्यक्ष झाले होते.

Major political setback as Nana Patole’s panel loses Bhandara Cooperative Bank election; MP Prashant Padole also suffers defeat.
Malegaon Blast Case Verdict: स्फोटावेळी नेमकं काय घडलं होतं? तत्कालीन पालकमंत्री भुजबळ अन् आमदार भुसेंनी सांगितलं; म्हणाले, शिवसेनेनं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com