Ayodhya Ram Mandir : मंदिरात जाणाऱ्या लोकांना अडविण्याचा हक्क कुणी दिला? पटोले संतापले!

Nana Patole on Rahul Gandhi : राहुल गांधींना अडविल्याबद्दल म्हणाले, ही तर हिटलरशाही
Nana Patole
Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News: भारत जोडो न्याय यात्रेवर असलेले काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना पोलिसांनी मंदिरात जाण्यापासून रोखल्यानंतर या घटनेबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. राहुल गांधी हे सध्या आसाममध्ये आहेत. आसाममधील बोर्डो थान मंदिरात राम मंदिरात सोमवारी (ता. 22) त्यांनी अभिषेकवेळी प्रार्थनेला जाण्याचा प्रयत्न केला.

मंदिरात जाण्यापूर्वी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या अन्य नेत्यांना जाण्यापासून रोखण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी यांनी रस्त्यावर ठिय्या दिला. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, मंदिरात जाणाऱ्या लोकांना अडविण्याचा हक्क सरकारला कुणी दिला?

Nana Patole
Nagpur : मोमीनपुरा भागातील संभाव्य तणाव वेळीच निवळला; व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात

कुणाच्याही आस्थेवरती पहारा लावण्याचा अधिकार भाजप सरकारला कोणी दिला? असा प्रश्न उपस्थित करीत पटोले म्हणाले की, ‘आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. राहुल गांधी मंदिरात जाणार होते. त्यांचे मंदिर दर्शन आधीच ठरलेले होते. पण भाजप सरकारने पोलिस तैनात करून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले. राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून का रोखले जात आहे ? इतरांच्या आस्थेवर पहारा लावणारे हे कोण? भाजप सरकार राहुल गांधींना मंदिरात जाण्यापासून रोखत आहे. कुणाच्याही आस्थेवरती पहारा लावण्याचा अधिकार भाजप सरकारला कोणी दिला? या अन्यायाविरोधात आम्ही लढत राहू!’

आसाममधील नागाव येथे सोमवारी (ता. 22) राहुल गांधी बोर्डी पोलीस ठाण्यातील संत श्री शंकरदेव यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेणार होते. मात्र त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. सुरक्षा दलांनी राहुल आणि इतर काँग्रेस नेत्यांना बाहेर रोखले.

या घटनेनंतर दिराबाहेर राहुल गांधी आणि सुरक्षा दलांमध्ये वादावादी झाली. मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याने सर्व नेत्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेनंतर दुपारी तीन वाजता मंदिरात येण्यास त्यांना सांगण्यात आले होते. या संपूर्ण प्रकारावर आमदार नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सरकारच्या या कृतीमुळे आता राज्यातील काँग्रेस आक्रमक झाली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस राहुल गांधी यांना मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आल्याच्या मुद्द्याचा प्रचारात वापर करण्याची शक्यता वाढली आहे. भाजप धार्मिक भावनांचा आधार घेत देशातील जनतेला भुलवित आहे. अशात जे लोक मंदिरात जाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यांना पोलिस पुढे करून अडविले जात असल्याबद्दलही काँग्रेसने टीका केली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Nana Patole
Nagpur Politics : माझे आयुष्यही नितीन गडकरी यांना मिळो... कोण म्हणालं असं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com