Nagpur : मोमीनपुरा भागातील संभाव्य तणाव वेळीच निवळला; व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात

Ayodhya Ram Mandir : महाल-कोतवाली परिसरातील मिरवणुकीवर आक्षेप
Police Bandobast in Nagpur.
Police Bandobast in Nagpur.Sarkarnama
Published on
Updated on

Police Bandobast : नागपुरातील मोमीनपुरा भागात काही वेळसाठी तणाव निर्माण झाल्यानंतर येथे व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाल ते कोतवाली परिसरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काहींनी आक्षेप घेतल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण ढाली होती. मात्र वेळीच हा तणाव निवळला. मोमीनपुरा भागातून मिरवणूक काढण्यात येऊ नये, अशी काहींची मागणी होती.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार अतिरिक्त पोलिस ताफ्यासह मोमीनपुरा भागात पोहोचले. पोलिसांनी वेळीच परिसराला चारही बाजूने वेढा घातला. त्यानंतर तणाव निवळला. सध्या या भागात खबरदारीचा उपाय म्हणून व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात असून दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Police Bandobast in Nagpur.
Nagpur RTO : महिला निरीक्षकाने झाडली दुसऱ्यावर गोळी; कारण अद्यापही गुलदस्त्यात

सोमवारी (ता. 22) महाल ते कोतवाली भागातून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पोद्दारेश्वर मंदिरापर्यंत जाणार होती. अशातच ही मिरवणूक मोमीनपुरा भागातून काढण्यात येऊ नये, अशी भूमिका घेत विरोधाला सुरुवात झाली. त्यामुळे मिरवणुकीदरम्यान तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच आयुक्त अमितेश कुमार यांनी मोमीनपुरा गाठले. अतिरिक्त पोलिस ताफाही पोहोचला. अमितेश कुमार यांनी मिरवणुकीतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. आमदार प्रवीण दटके यांनी देखील मध्यस्थी केली.

तातडीने मोमीनपुरा भागाला पोलिसांनी वेढा घातला. दोन्ही गटातील लोकांशी चर्चा केल्यानंतर मिरवणूक अग्रसेन चौक आणि मेयो हॉस्पिटलकडून नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे आमदार प्रवीण दटके यांनी यावेळी सामंजस्याची भूमिका दाखवत मिरवणुकीतील लोकांना शांत केले. त्यामुळे तणाव निवळला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी अग्रसेन चौकापासूनच लोखंडी कठडे उभारत वाहतूक बंद केली. वाहनांना अन्य मार्गाने वळविण्यात आले. सुमारे पाच तास अग्रसेन चौक ते मेयो हा मार्ग बंद ठेवण्यात आला होता. काहींनी यावेळी पोलिसांशी विनाकारण वाद घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. नागपूर शहरात सध्या पूर्णपणे शांतता आहे.

मोमीनपुऱ्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने नियंत्रण मिळविले आहे. सध्या या भागात खबरदारीचा उपाय म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये किंवा सोशल माध्यमांवर आलेल्या पोस्ट खात्री केल्याशिवाय फॉरवर्ड करू नये, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी केले.

Police Bandobast in Nagpur.
Nagpur Politics : माझे आयुष्यही नितीन गडकरी यांना मिळो... कोण म्हणालं असं?

याप्रकरणी पोलिसांनी कोणालाही ताब्यात घेतलेले नाही अथवा तूर्तास कोणाविरुद्ध कारवाई देखील करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. शहरातील संवेदनशील भागात तणाव निर्माण होऊ शकतो, हे माहिती असताना सुद्धा मिरवणुकीला या भागातून जाण्याची परवानगी देण्यात आली होती का, असा प्रश्न या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे. मिरवणुकीच्या स्वागतासाठी या भागात स्वागत कमानीही उभारण्यात आल्या होत्या.

Edited By : Prasannaa Jakate

Police Bandobast in Nagpur.
Nagpur Zilla Parishad : फायली रोखण्याचा मुद्दा गाजला स्थायी समितीच्या बैठकीत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com