Nana Patole Vs BJP : काँग्रेसच्या नाना पटोलेंचा गडकरी- फडणवीसांना बालेकिल्ल्यातच दे धक्का; जवळच्या मेघे कुटुंबालाच फोडलं

Abhyuday Meghe join Congress : .केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मित्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पुतण्यालाच गळाला लावत काँग्रेसने विदर्भात आपले इरादे स्पष्ट केले आहेत.
 Nana Patole-  Nitin Gadkari - Devendra Fadnavis News
Nana Patole- Nitin Gadkari - Devendra Fadnavis NewsSarkarnama
Published on
Updated on

Vardha News : लोकसभेला विदर्भात घवघवीत यश मिळवल्यानंतर आता महाविकास आघाडी विशेषत: काँग्रेसने तिथे जोरदार तयारी सुरू केली आहे. या सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पक्षाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही विदर्भातील असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

काँग्रेसने आता राज्याच्या राजकारणातले चाणक्य समजले जाणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बालेकिल्ल्यातच भाजपला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. नाना पटोलेंनी यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मित्र आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पुतण्यालाच गळाला लावत काँग्रेसने विदर्भात आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत मुंबई येथे अभ्युदय मेघे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी हा मेघेंसारखा युवा नेता पटोले यांनी काँग्रेस पक्षात आणला आहे. मेघे हे वर्धा विधनासभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी उमेदवारीकरिता नाना पटोले यांच्याकडे अर्ज सादर केल्याची देखील चर्चा आहे.

भाजप नेते दत्ता मेघे यांचे पुतणे असलेले अभ्युदय मेघे यांचा काँग्रेस पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.कारण वर्धा विधानसभा मतदारसंघात मेघे कुटुंबाचा चांगलाच दबदबा आहे.अभ्युदय यांचा जनसंपर्क दांडगा असून अभ्युदय मेघे वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष पदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.

 Nana Patole-  Nitin Gadkari - Devendra Fadnavis News
Hingoli Assembly Constituency : हिंगोलीत मनसेचे ओबीसी कार्ड, प्रमोद कुटे यांना उमेदवारी जाहीर..

दत्ता मेघे यांनी राज्याच्या राजकारणातला एकेकाळी काँग्रेसचा प्रमुख चेहरा होते. चार टर्म लोकसभेला आणि राज्यसभेची खासदार म्हणून निवडून गेले होते. ते भाजप नेते आणि मंत्री नितीन गडकरी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेससोबतचा घरोबा सोडत भाजपची वाट धरली होती. त्यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचा मुलगा सागर मेघे हेही हिंगणा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार आहेत.

राज्यात राजकारणात आता आणखी एका काका-पुतण्यांचं राजकारण चर्चेत आलं आहे. नागपूरचे अनिल देशमुख- आशिष देशमुख, जयदत्त क्षीरसागर- संदीप क्षीरसागर,अजित पवार - रोहित पवार, गोपीनाथ मुंडे- धनंजय मुंडे- राजेंद्र शिंगणे- गायत्री शिंगणे,सुनील तटकरे- अनिकेत तटकरे, प्रकाश सोळंके- जयसिंग सोळंके अशा जोड्या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेत आहेत.आता त्यात दत्ता मेघे आणि अभ्युदय वाघ याही काका- पुतण्याच्या जोडीची भर पडली आहे.

 Nana Patole-  Nitin Gadkari - Devendra Fadnavis News
Sheikh Hasina : ‘शॉर्ट नोटीस’वर आलेल्या शेख हसीना भारतातून कधी जाणार? मोदी सरकारने दिली अपडेट...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com