भंडारा : १० मार्चनंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होणार असल्याचे सांगितले जात आहे. तेव्हाच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्य सरकार दुरुस्त करणार आहेत. राज्य सरकारमध्ये सध्या जे काही सुरू आहे, ते ठीक नाही. याबद्दल सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी माझे बोलणे झालेले आहे. १० मार्च रोजी ५ राज्यांतील निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतर सरकार दुरूस्त करणार असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
काल भंडारा (Bhandara) जिल्ह्यात कॉंग्रेसमध्ये (Congress) मेगाभरती झाली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नानांच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. १० मार्चनंतर नाना पटोले मोठा राजकीय भुकंप तर करणार नाहीत ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. नाना (Nana Patole) नक्की करणार काय, याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. यावेळी बोलताना नाना म्हणाले, खोटं बोला पण रेटून बोला, अशी भाजपची (BJP) स्थिती आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जी माहिती दिली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी म्हणायला पाहीजे होते की आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहोत. पण ते तसे बोलले नाहीत आणि बोलणारही नाहीत.
ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग करण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यांना माहिती आहे की, या यंत्रणा आपले काही बिघडवणार नाही. त्यामुळे त्यांनी बेशरमपणाची हद्द पार केली आहे. संजय राऊत यांनी केलेले आरोप खरे आहेत. आम्ही राऊतांच्या सोबत आहोत. आता भाजप नेत्यांनी चौकशीला सामोरे जायला हवे. भ्रष्टाचार नक्कीच झालेला आहे. ईओडब्ल्यूच्या माध्यमातून त्यांनी सर्व चौकशी करावी आणि वस्तुस्थिती समोर आणावी, अशी आमची मागणी आहे.
आसामच्या मुख्यमत्र्यांचं समर्थन कशाला?
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्त्री शक्तीचा अपमान करणारी भाषा वापरली, त्याचे भाजप समर्थन करत आहे. त्याबद्दल कुणी काही बोलायला तयार नाही. काल आम्ही विरोधी पक्षनेत्यांच्या घरापुढे जाऊन मोदींनी माफी मागावी, यासाठी निदर्शने करायला निघालो होते. तेव्हा त्यांनी मुबईमध्ये काय धिंगाणा घातला तो मुंबईकरांनी बघितला. हिंसेचे आणि चुकीच्या भाषेचे समर्थन आम्ही कधीही करणार नाही, हे जाहीरपणे आम्ही सांगितले आहे. पण आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मातृशक्तीवर जो आक्षेप घेतला आहे, मनुवादाचा परिचय दिला, त्यावर भाजप का बोलत नाही, हा आमचा प्रश्न आहे, असे नाना पटोले म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.