Narendra Modi Oath Ceremony : भाजपच्या जिल्हाध्यक्षांची दिल्लीची ट्रेन पकडण्याची धावपळ, मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण

BJP District President Narendar Modi Oath ceremony : नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी प्रथमच आमदार, जिल्हाध्यक्ष, संघटन सचिव तसेच निवडणूक प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहेत.
Narendar Modi Oath ceremony
Narendar Modi Oath ceremonysarkarnama

Narendar Modi Oath ceremony ः नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा रविवारी (ता.9) पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीला व्हिआयपी पाहुणे कोण उपस्थित असतील, याची चर्चा आहे. या चर्चांमध्ये पक्षासाठी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना शपथविधीना निमंत्रीत करून त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. शपिथविधी सोहळ्याला भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्यासह आमदार आणि जिल्हा, शहर अध्यक्षांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांची दिल्लीची ट्रेन पकडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. यंदा प्रथमच शहर व जिल्हाध्यक्षांना बोलवण्यात आले असल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. रविवारी (ता.9) सायंकाळी 5 वाजता दिल्ली येथे मोदी Narendra Modi तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.

यावेळी प्रथमच आमदार, जिल्हाध्यक्ष, संघटन सचिव तसेच निवडणूक प्रमुखांना आमंत्रित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष या नात्याने चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संदेश धाडले आहेत. आपण या सोहळ्याला आंमत्रित असून वेळेपूर्वी पोहचावे, अशा सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत. पुढील सूचना लवकरच मिळेल असेही कळवण्यात आले आहेत.

Narendar Modi Oath ceremony
Narendra Modi Swearing in Ceremony : हाय अलर्ट, ड्रोनला बंदी, नो फ्लाय झोन..! मोदींच्या शपथविधीसाठी तगडा बंदोबस्त

शुक्रवारी (ता.6) रात्री हे संदेश धडकू लागल्याने कोणाकोणाला बोलावले याची विचारणा होऊ लागली.दिल्लीत जाणाऱ्या पदाधिकाऱ्याला स्वतःची व्यवस्था करावी लागणार आहे. शहर भाजपचे अध्यक्ष बंटी कुकडे यांनाही शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे. यापैकी काही पदाधिकारी आजच रेल्वेने रात्री रवाना होणार आहेत. काही उद्या रविवारी विमानाने निघणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com