Solapur Lok Sabha 2024 : आमदार प्रणिती शिंदेंनी स्वीकारले भाजपच्या राम सातपुतेंचे चॅलेंज

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी समोरासमोर या, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत काय काम केले आहे, याचा हिशेब देतो, असे चॅलेंज आमदार प्रणिती शिंदे यांना दिले होते.
Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 April : सोलापूर लोकसभा मतदारसंघात दोन युवा आमदार समोरासमोर आले आहेत. अगदी पहिल्या दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अगदी बंगला, मुख्यमंत्रिपद, केंद्रीय मंत्री इथपर्यंत व्यक्तिगत पातळीपर्यंत उकाळ्या पाकाळ्या काढण्यात आल्या. समोरासमोर या, मोदी सरकारने दहा वर्षांत काय केले, हे मी तुम्हाला सांगतो, असे आव्हान आमदार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना दिले होते. ते आव्हान शिंदे यांनी स्वीकारले आहे.

भाजपकडून माळशिरसचे आमदार राम सातपुते, तर काँग्रेसकडून ‘सोलापूर शहर मध्य’च्या आमदार सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सातपुते यांची उमेदवारी जाहीर होताच प्रणिती शिंदे यांनी पत्राद्वारे चिमटे काढत त्यांचे स्वागत केले होते. प्रणिती शिंदे यांच्या पत्राला सातपुते यांनीही हजरजबाबीपणे उत्तर दिले होते. पुढच्या काळात हे आरोप-प्रत्यारोप वाढतच गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde-Ram Satpute
Nagpur Lok Sabha 2024 : नागपुरातील 108 माजी नगरसेवकांवर भाजपचा ‘वॉच’; लोकसभेतील लीडवरच ठरणार पालिकेचे तिकीट

आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचा बंगल्यापासून उपरा उमेदवार म्हणून काँग्रेसकडून टीका करण्यात आली. गेल्या दहा वर्षांत भाजप खासदारने काय केले, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय गृहमंत्री असताना सोलापूरसाठी काय केले, असा सवाल भाजपकडून केला जाऊ लागला. त्याचवेळी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनीही माझ्यावर विरोधकांकडून चारित्र्यहननाचे आरोप केले जातील, असा आरोप करण्यात आला.

दरम्यान, भाजप आणि काँग्रेस उमेदवारांच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे विकासाच्या मुद्द्यांऐवजी प्रचार भलतीकडेच जाऊ लागला. त्यावर मतदारांमधूनही नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी समोरासमोर या, मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत काय काम केले आहे, याचा हिशेब देतो, असे चॅलेंज आमदार प्रणिती शिंदे यांना दिले होते.

Praniti Shinde-Ram Satpute
Dhule Lok Sabha Constituency : भाजप लागला प्रचाराला; पण काँग्रेसला उमेदवारच मिळेना...!

प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांनी आज ‘मॉर्निंग वॉक’ करत मतदारांशी संवाद साधला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांचे आव्हान स्वीकारले. विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करायला मी कधीही तयार आहे. मी सोलापूरचीच (Solapur) आहे. मी २४ बाय ७ कायम उपलब्ध असते, असे म्हणत चर्चेला एकदा येण्याची तयारी दाखवताना पुन्हा एकदा बाहेरचा उमेदवार हा मुद्दा अधोरेखित केला.

R

Praniti Shinde-Ram Satpute
Dharashiv Lok Sabha Constituency : 'मित्रां'ची नाराजी दूर करण्याचे राणा पाटलांसमोर चॅलेंज!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com