Sharad Pawar Party News : दादांच्या जन सन्मान यात्रेला आता शिव स्वराज्य यात्रेने राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

Political News : नागपूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा आटोपताच त्यास प्रत्त्युतर देण्यासाठी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिव स्वराज्य यात्रा नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे.
amol kolhe jayant patil
amol kolhe jayant patilsarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करीत आहेत. त्यामुळे एकमेकांवर टीका करण्याची संधी सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेतेमंडळी सोडत नसल्याने गेल्या काही दिवसापासून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता नागपूर जिल्ह्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा आटोपताच त्यास प्रत्त्युतर देण्यासाठी आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची शिव स्वराज्य यात्रा नागपूर जिल्ह्यात दाखल होत आहे.

भाजपचे (BJP) आमदार असलेले आणि राष्ट्रवादीचा दावा असलेल्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात येत्या बुधवारी शिव स्वराज्य यात्रा धडकणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यात्रेला संबोधित करणार असून ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा (NCP) समाचार घेणार आहेत. (Sharad Pawar Party News)

अजित पवार यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारससंघात जन सन्मान यात्रेचा प्रमुख कार्यक्रम घेतला होता. या माध्यमातून त्यांनी महायुतीमध्ये काटोलवर आपला दावा सांगितला आहे. हे बघता काटोलमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आहे. जयंत पाटील शिव स्वराज्य यात्रा घेऊन ११ सप्टेंबरला हिंगण्यात येत आहे.

हिंगणा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे. माजी मंत्री रमेश बंग येथून लढण्याची तयारी करीत आहेत. त्यांच्या संघटनेमार्फत समाज सेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला शरद पवार नुकतेच येऊन गेले. रमेश बंग आघाडी सरकारच्या कार्यकाळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते.

amol kolhe jayant patil
Congress News : राजकीय आखाड्यातील बजरंग, विनेशच्या नव्या डावाने भाजप हैराण; काँग्रेसमध्ये नवचैतन्य !

भाजपचे समीर मेघे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मेघे यांच्या पराभवासाठी एकेकाळी भाजपचे आमदार असलेले विजय घोडमारे यांना राष्ट्रवादीतून लढवण्यात आले होते. मात्र, त्यांना मेघे यांना पराभूत करण्यास अपयश आले. लोकसभेच्या निवडणुकीत हिंगणा मतदारसंघाने महाविकास आघाडीचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना 17 हजारांचे मताधिक्य दिले आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांच्या आशा उंचावल्या आहेत. हे बघून बंग पुन्हा तयारीला लागले आहेत. त्यांचे पुत्र दिनशे बंग हे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत.

महाविकास आघाडीत सध्या पक्षांतर्गत कुरघोड्या आणि माऱ्यामाऱ्या नसल्याने अनेकांची येथून लढण्याची इच्छा आहे. माजी मंत्री सुनील केदार यांनी आमदार मेघे यांना उघड चॅलेंज दिले आहे. केदार आणि बंग यांचा घरोबा आहे. रमेश बंग हे बाबासाहेब केदारांचे मानसपुत्र आहेत. हे बघता यावेळी हिंगण्यामध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता दिसत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणा होणाऱ्या या कार्यक्रमात जयंत पाटील यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, अनिल देशमुख प्रामुख्याने सहभागी होणार असल्याचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश प्रवक्ता प्रवीण कुंटे पाटील यांनी कळविले आहे. त्यामुळे सर्वांचे या यात्रेकडे लक्ष लागले आहे.

amol kolhe jayant patil
Manoj Jarange Patil : भुजबळांचं चॅलेंज अन् जरांगे-पाटलांनी चार शब्दांत विषयच संपवला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com