Video Amol Mitkari : अमोल मिटकरी यांचे मुलीसह पोलिस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन, अमित ठाकरेंवर साधला निशाणा

Ncp Amol Mitkari Amit Thackeray Jai Malokar Death: अमित ठाकरे अकोल्यात येत आहेत तर उपकार करीत नाहीत. त्यांनी कालच जय यांच्या अंत्यसंस्काराला यायला पाहिजे होते, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
 Amol Mitkari
Amol Mitkarisarkarnama
Published on
Updated on

Amol Mitkari News : आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. या राड्यानंतर मनसेचे पदाधिकारी जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. हल्ल्याच्या प्रकरणात अमोल मिटकरी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आज (गुरुवारी) अमोल मिटकरी जिल्हा पोलिस अधिक्षक बच्चनसिंग यांच्या भेटीसाठी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आले होते. मनसे कार्यकर्त्यांचा आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींना पळून जाण्यासाठी काही पोलीस अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा आरोप मिटकरी यांनी केला. पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या बाहेर आपल्या मुलगी अपूर्वा मिटकरी, भाऊ पंकज मिटकरी यांच्यासह अमोल मिटकरींनी ठिय्या आंदोलन केले.

मनसेचा सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांच्यावर मिटकरींनी जोरदार हल्लाबोल केला आहे. कर्णबाळा हा पोलिसांचा जावई आहे का? त्याला आधी अटक करा. अशी मागणी करत कर्णबाळा याला अमोल मिटकरी कोण आहे दाखवून देईल, असा इशारा देखील मिटकरी यांनी दिला.

 Amol Mitkari
Mahayuti News : भाजप, शिंदे गटाची धडधड वाढली; महायुतीकडे अजितदादांनी मागितल्या तब्बल इतक्या जागा

हल्ला विषयी मी सरकारला माहिती दिली आहे. योग्य ती कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपींना अभय दिला असेल तर याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली

अमित ठाकरेंना टोला

अमित ठाकरे आज (गुरुवारी) जय जय मालोकार यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत. यावरून अमोल मिटकरी यांन अमित ठाकरेंवर निशाणा साधला. 'अमित ठाकरे अकोल्यात येत आहेत तर उपकार करीत नाहीत. त्यांनी कालच अंत्यसंस्काराला यायला पाहिजे होते. त्यांनी दुःखात सहभागी व्हायला पाहिजे.', असे मिटकरी म्हणाले. तसेच जय याच्या कुटुंबाला आर्थिक मदत त्यांनी जाहीर करायला पाहिजे, असे देखील मिटकरी यांनी सांगितले.

 Amol Mitkari
Video Ramdas Athawale: रामदास आठवले म्हणतात, ठाकरे- फडणवीसांमधला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मीच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com