Sharad Pawar and Uddhav Thackeray
Sharad Pawar and Uddhav ThackeraySarkarnama

Praful Patel News : 'मविआ' सरकारमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद अपेक्षित होतं,पण ठाकरेंनी...''; पटेलांचा गौप्यस्फोट

NCP Political News : '' भाजपकडून आपल्याला न्याय मिळणार...''
Published on

Nagpur : राष्ट्रवादीतील बंडाळीला आता दोन महिने उलटून गेले आहेत. एकमेकांवर टीकेची एकही संधी राष्ट्रवादीतील दोन्ही गटाकडून सोडली जात नाही. याचवेळी दोन्ही गटाच्या नेतेमंडळींकडून नवे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदावरुन भाजपसोबत खटके उडाल्यानंतर २०१९ ला शिवसेनेनं काँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. आता त्याच उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून नवा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

अजित पवार गटाच्या पहिल्या संकल्प मेळाव्याचं आयोजन रविवारी नागपूरमध्ये करण्यात आलं होतं. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. पटेल म्हणाले, शिवसेनेकडे ५६ आमदारांचं संख्याबळ होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे ५४ आमदार होते. त्यामुळे राष्ट्रवादीला दोन-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद पाहिजे होतं. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो असता ते काहीच बोलले नाहीत असा दावा पटेलांनी केला आहे.

Sharad Pawar and Uddhav Thackeray
Maratha Reservation News : गोदापात्र प्रतिकात्मक जलसमाधी ; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

पटेल नेमकं काय म्हणाले...?

खासदार प्रफुल्ल पटेल(Praful Patel) यांनी महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री पदावर थेट भाष्य केले आहे. ते म्हणाले, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मुख्यमंत्रिपद मिळावं ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे(Uddhav Thackeray) केली. तेव्हा त्यांनी मौन धारण केले, शिवसेनेचा एकही नेता त्यावर बोलायला तयार नव्हता. मुख्यमंत्री पदासंदर्भातील चर्चा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हेदेखील उपस्थित होते.

शिवसेनेकडे तेव्हा 56 आमदार होते तर आपल्याकडे 54 होते. या संख्येच्या जोरावर राष्ट्रवादी(NCP)ला अडीच नाही तर किमान दोन वर्षांसाठी तरी मुख्यमंत्रिपद अपेक्षित होते. यासंबंधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चेसाठी गेलो होतो. मात्र, ते या प्रस्तावावर काहीही बोलले नाही असा दावा त्यांनी केला.

Sharad Pawar and Uddhav Thackeray
Katewadi Maratha Andolan : काटेवाडीकरांची अजितदादांकडे मोठी मागणी; फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या; नाही तर त्यांची साथ तरी सोडा

भाजपकडून आपल्याला न्याय मिळणार

राष्ट्रवादीला अनेकवेळा मुख्यमंत्रिपदाची संधी आली. मात्र, कायम आपण ही संधी गमावली. काँग्रेसने सुरुवातीपासून झुकते माप घेतले. राष्ट्रवादी काँग्रेसला ठराविक जागा दिल्या. प्रत्येकवेळी आम्ही माघार का घ्यायची, मग कधीही पहिल्या क्रमांकावर येण्याची आशा बाळगायची नाही का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपकडून आपल्याला न्याय मिळणार आहे. यापुढे पक्षाला अधिक बळकट करायचे असल्याचेही ते म्हणाले.

निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल...

प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘पक्षाचे नाव आणि चिन्हाची चिंता करु नका. आपल्यासोबत 43 आमदार सध्या आहेत, आणखी आमदार सोबत येतील. त्यामुळे निवडणूक चिन्ह आणि पभाचे नाव याबद्दल निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल असा विश्वासही पटेल यांनी व्यक्त केला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com