assembly elections News : राजेंद्र शिंगणेंवर केली मिटकरींनी टीका; म्हणाले, 'टच्च पोट फुगल्याने निघाले... '

NCP seat sharing formula News :आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करण्याची चढाओढ लागली आहे. विशेषता अजित पवार यांच्या गटातून शरद पवार यांच्या गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्यात येत आहेत.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

NCP seat sharing News : विधानसभा निवडणुकीची घोषणा मंगळवारी निवडणूक आयोगाने केली. त्यामुळे आता येत्या काळात राज्यातील वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करण्याची चढाओढ लागली आहे. विशेषता अजित पवार यांच्या गटातून शरद पवार यांच्या गटात मोठ्या प्रमाणात प्रवेश करण्यात येत आहेत.

बुलढाण्यातील सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र शिंगणे हे अजित पवारांची साथ सोडणार असल्याचे समजते. शिंगणे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे समजते. काही दिवसांआधी सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून एका नेत्याने प्रवास केला होता. यावेळी फाईलने त्यांनी चेहरा झाकला होता. सुप्रिया सुळेंच्या गाडीतून प्रवास करणारा नेता म्हणजे राजेंद्र शिंगणे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे शिंगणे यांचा शरद पवार गटातील प्रवेश निश्चित झाल्याचे समजते.

या प्रवेशाची माहीती मिळताच राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP) अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne ) यांच्यावर सडकून टीका केली आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर टीका करीत आमदार शिंगणे यांच्या कारभारावर टीका करताना लक्ष्य केले आहे.

बुडालेल्या जिल्हा बँकेला दिला ज्यांनी थारा...दादाच्या आशीर्वादाने निधीचा कोट्यावधी पसारा ..टच्च फुगलंय पोट निघतोय तुतारीच्या दारा... भोवती सगळा फिरतोय माझ्या ठेकेदारी पसारा....स्वार्थासाठी जिथे गगण ठेंगणे आहे ते हे महाभाग डॉ. राजेंद्र शिंगणे, अशा प्रकारचे ट्विट अमोल मिटकरीने करीत सडकून टीका केल आहे. त्यामुळे सर्वांचेच याकडे लक्ष लागले आहे.

Amol Mitkari
BJP Pune: इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात; काही तासांतच पहिली यादी येणार; भाजप जुन्या-नव्यांचा समतोल साधणार?

दरम्यान, अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हे देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. उमेश पाटील हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. उमेश पाटील शरद पवारांच्या घरी जात असताना त्यांनी प्रसार मध्यमाला प्रतिक्रिया दिली. मी राजकारणात आल्यापासून मोहोळमधील हुकुमशाहीला विरोध आहे.

Amol Mitkari
Ajit Pawar: पक्षातील ‘आउटगोइंग’वर प्रश्न, अजितदादा चिडले अन् हिंदीतून फाडफाड बोलून गेले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com