VIDEO Amol Mitkari Big Statement: '...तर प्रत्येक पक्षाला स्वबळावर लढावं लागेल!'; मिटकरींचा दावा,मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत

Mahayuti Seat Sharing News: महायुतीतील तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असून त्यात शाब्दिक वादामुळे निर्माण झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न केले जाणार आहे.
Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama

Akola News: लोकसभा निवडणुकीतील निकालानं महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे.महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं तर महायुतीला अपयश पचवावं लागलं. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे.

जागावाटपांवरुन आघाडी आणि युतीत हेवेदावे सुरू झाले आहेत. काही फॉर्म्युल्यांची जोरदार चर्चाही रंगली आहे.महायुतीतही जागावा़टपाचा मुद्दा कळीचा ठरण्याची शक्यता आहे.अशातच आपल्या रोखठोक विधानांमुळे नेहमी चर्चेत राहणारे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

विधान परिषदेचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी महायुतीतील जागावाटपाच्या दाव्यांवरुन मोठं विधान केले आहे. त्यांचे हे विधान म्हणजे आगामी काळातील मोठ्या राजकीय घडामोडींचे संकेत तर नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.मिटकरी यांनी महायुतीतल्या (Mahayuti) तीनही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी लागेल असं मिटकरी म्हणाले.

आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील एका कार्यक्रमानिमित्त माध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी महायुतीच्या जागावाटपासह इतर विषयांवरही भाष्य केले.यावेळी त्यांनी महायुतीतील तीनही नेत्यांची मुंबईत बैठक होणार असून त्यात शाब्दिक वादामुळे निर्माण झालेल्या डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Amol Mitkari
Sinnar Assembly Constituency : सिन्नर विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत? ; माणिकराव कोकाटेंसमोर असणार 'हे' आव्हान!

अमोल मिटकरी म्हणाले,महायुतीत जर आम्हाला 55 जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही.महायुती आणि महाविकास आघाडीतील तीनही महत्त्वाचे पक्ष सध्या 100 जागांवर दावा केला जात आहे.याचवेळी महायुतीतील घटक पक्षांकडूनही 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला निवडणूक वेगवेगळी लढवावी लागेल असेही त्यांनी सांगितले. याचवेळी मिटकरींनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर आणि मूर्तिजापूर मतदारसंघावर दावा ठोकला आहे.

तीनही पक्षाचे नेते भेटणार

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तीनही पक्षांच्या समन्वय समितीचे नेते आणि प्रवक्ते मूंबईत एकत्र मुंबईत एकत्र येणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजप,शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर चर्चा केली जाणार असून त्यात महायुतीतील वातावरण चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.

Amol Mitkari
Sanjay Jadhav Oath : तिसऱ्यांदा खासदारकीची शपथ घेताना संजय जाधवांचं परभणीकरांना मोठं वचन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com