Vijay Wadettiwar News : 'राष्ट्रवादी अजित पवारांची झाली, अन् अजितदादा..' ; वडेट्टीवारांनी लगावला टोला!

NCP MLA Hearing News : 'कितीही पळाला तरी सेकंद काट्याची किंमत सेंकदामध्ये असते अन् तास काटा हा...' असही वडेट्टीवारांनी म्हटलं आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

NCP MLA Disqualification Case Result : भाजपाने अतिशय चाणाक्षपणे आधी शिवसेना फोडली, यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडले. अन् आता काँग्रेसचा राज्यातील प्रमुख चेहरा आपल्या गळाला लावला. या साऱ्या घटनाक्रमांनंतर आता राज्यात विरोधी पक्ष अलर्ट मोडवर आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरातून अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

अजित पवार यांचा पक्ष हा मूळ राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी गुरुवारी दिला. दरम्यान या निकालावर भाष्य करतांना 'राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची झाली, अनं अजित पवार हे भाजपचे झाले.' असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar
NCP MLA Disqualification Case Result : ...म्हणून दहावे परिशिष्ट येते मदतीला; पक्ष फुटला तरी अपात्र कुणी नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार हे समीकरण संपूर्ण देशाला माहीत आहे. पण आज विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार यांच्या बाजूने निकाल देत पक्ष त्यांचा असल्याचे सांगितले. अजित पवार यांनी पदासाठी पक्षाची विचारसरणी गहाण ठेवली आहे. ज्या पध्दतीने असे निकाल दिल्या जात आहेत, ते धक्कादायकच आहेत. राष्ट्रवादीचे चिन्ह हे घड्याळ आहे. घड्याळाचा काटा कितीही जोराने फिरला तरी तो सेकंदात मोजला जातो.

अन् तासकाटा कितीही हळूवारपणे फिरत असाल तरी तो तासकाटाच असतो. त्यामुळे सेकंदकाटा हा शेवटी सेकंदकाटाच असतो. येणारा काळ अजित पवार यांचा सेकंदाचा ठरणार आहे. आणी जो मूळ पक्ष आहे, त्या शरद पवार यांचा तासकाटाच ठरेल.' अशी प्रतिक्रिया देत विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला.

Vijay Wadettiwar
NCP MLA Disqualification : '10 व्या सूचीचा गैरवापर करून आमदारांना धमकावू नका'; नार्वेकरांनी शरद पवार गटाला फटकारले!

डोळे बंद करून, आपला मेंदू बधीर करून, कानात बोळा घालून त्यांनी दिलेला हा निकाल आहे. पण त्यांनी निकाल दिलाय तरी कुठे? मुळात जे पक्ष सोडून गेले, ज्यांनी पक्षाशी गददारी केली, त्यांच सदस्यत्व रदद होईल, त्यांच्याविरोधात निकाल येणे अपेक्षित होते. पण यांच्याकडून आपणास पारदर्शक निकालाची अपेक्षा करणे गैर आहे. आता सर्वोच्च न्यायालयातूनच येणाऱ्या निकालाची आपणास वाट बघावी लागणार. कारण, सर्वोच्च न्यायालयातून ज्यावेळी याबाबतचा निकाल येईल. तो देशातील अशा पध्दतीने राजकारण करणाऱ्यांना मोठा धडा असेल.' असेही वडेटटीवारांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com