Bhandara : असेही पक्षप्रेम! कार्यकर्त्याने रक्तानेच लिहून पाठवले नेत्याला पत्र...

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना उद्देशून लिहिले, आम्ही आपल्या सोबतच
NCP Party Worker's Letter.
NCP Party Worker's Letter.Sarkarnama
Published on
Updated on

Letter To Sharad Pawar : काही वर्षांपूर्वी रूपेरी पड्यावर गाजलेला ‘झेंडा’ हा मराठी चित्रपट आठवतोय. या चित्रपटात पक्षाच्या प्रेमासाठी जसे कार्यकर्ते काहीही करायला तयार होतात, अगदी तसेच प्रेम भंडारा जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांने दाखवून दिले आहे.

आपल्या नेत्याला हमी देण्यासाठी या कार्यकर्त्याने चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहिले आहे. रक्ताच्या नात्यातील लोक सोडून गेल्याने अशांना प्रत्युत्तर देण्यासाठी या कार्यकर्त्याने स्वत:च्या रक्तानेच आपली पक्षनिष्ठा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.

NCP Party Worker's Letter.
Bhandara : ‘मी काय म्हणतो... अधूनमधून दिसणारे सेवक वाघाये हे करू शकतील?’

‘आपल्या रक्ताच्या नात्यातील लोक स्वार्थासाठी आपल्याला सोडून गेले. मात्र आपण घाबरू नका. आम्ही आपल्या सोबत आहोत’, असा मजकूर असलेले हे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने खासदार शरद पवार यांना पाठविले आहे. अजित पवार यांनी बंड केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. पक्षातील काही नेते अजित पवार यांच्यासोबत बाहेर पडले आहेत, तर काही अद्यापही शरद पवार यांच्यासोबत आहेत. अशात भंडारा येथील कार्यकर्त्याने आपल्या ‘साहेबांना’ ही भावनिक साद घातली आहे.

अजय मेश्राम हे पवारांना पत्र पाठविणाऱ्या कार्यकर्त्याचे नाव आहे. मेश्राम भंडारा-पवनी विधानसभा मतदार संघाचे प्रमुख आहेत. नुकताच गुरुवारी (ता. 12) शरद पवार यांच्या वाढदिवस झाला. तेव्हापासून रविवारपर्यंत (ता. 24) राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विविध उपक्रम राबवित आहेत. त्यातच मेश्राम यांनी रक्ताने पत्र लिहित ते पवारांना पाठविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजित पवार यांच्यासह पक्षातून अनेक नेते बाहेर पडले तरी कोणताही परिणाम होणार नाही, असे त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पक्षातील इतर नेते सांगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकनिष्ठ कार्यकर्ते शरद पवारांसोबत आहे, असे दोन्ही नेते सांगत आहेत. अशातच मेश्राम यांनी रक्ताने लिहिलेल्या पत्रामुळे खासदार सुळे आणि आमदार पवार करीत असलेले दावे अधोरेखित झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार एकाकी पडल्याने सांगितल्या जात होते. मात्र मेश्राम यांच्यासारखे कार्यकर्ते जोपर्यंत आहेत, तोपर्यंत पवार एकाकी पडूच शकत नाहीत, असे आता भंडाऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बोलत आहेत.

विदर्भातील भंडारा-गोंदिया जिल्हा अजित पवार गटाचे नेते खासदार प्रफुल पटेल यांचा गड मानला जातो. दोन्ही जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते, आमदार, बहुसंख्य कार्यकर्ते प्रफुल्ल पटेलांसोबत आहेत आणि पटले अजित पवारांसोबत. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे काटे उलटे फिरविण्यात अजित पवार गटातील नेत्यांना यश मिळाले. अशात मेश्राम यांच्यासारखे कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठिशी उभे राहात आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

NCP Party Worker's Letter.
Bhandara : वाळू डेपोवरून माजी आमदार आणि जिल्हाधिकारी येणार आमने-सामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com