Pawar VS Hake : 'गुत्त्यावर बसणारा लक्ष्मण हाके नेता नव्हे दलाल', पवार संतापले, काळं फासण्याचा इशारा

Prashant Pawar Laxman Hake : लक्ष्मण हाके स्वयंघोषित ओबीसींचे नेते आहेत. त्यांना कोणी नेता केले नाही आणि त्यांच्या पाठीशीसुद्धा ओबीसी समाज नाही, अशी टीका प्रशांत पवार म्हणाले.
Laxman Hake Ajit Pawar
Laxman Hake Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Prashant Pawar News : लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत. हाके यांनी आठ दिवसांच्या आत माफी मागितली नाही तर काळे फासण्याचा इशारा, राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भाचे प्रवक्ते आणि नागपूर शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिला आहे.

बारमध्ये, गुत्त्यावर बसणारा हाके केव्हापासून ओबीसी समाजाचा नेता झाला, अशी विचारणा करून  तो नेता नव्हे तर दलाल असल्याचा आरोप देखील प्रशांत पवार यांनी केला आहे.

दोन दिवसांपूर्वी हाके यांनी अजित पवार एकद्या मधमाशीप्रमाणे अर्थखात्याला चिटकून बसले असल्याचा आरोप केला. पैशासून सत्ता आणि सत्तेतून पैसा असे त्यांचे धोरण असल्याचेही त्यांनी जाहीरपणे म्हटले होते. त्यांच्या या टीकेने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतापले आहे. प्रशांत पवार यांनी तर थेट त्यांना काळे फासण्याचा इशारा दिला आहे.

लक्ष्मण हाके स्वयंघोषित ओबीसींचे नेते आहेत. त्यांना कोणी नेता केले नाही आणि त्यांच्या पाठीशीसुद्धा ओबीसी समाज नाही. फक्त वाकडेतिकडे व काहीतरी स्फोटके विधाने करून ते आपल्याकडे लक्ष वेधून घेत असतात. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय नेते डॉ. बबनराव तायवाडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, भाजपचे आमदार परिणय फुके हे ओबीसींचे नेते आहे. हाके याची अजित पवार यांच्यावर आरोप करण्याची लायकी त्यांची नाही, असे देखील प्रशांत पवार म्हणाले.

Laxman Hake Ajit Pawar
Uddhav Thackeray : मनसेसोबत युती होणार म्हणजे होणार! यावर शिक्कामोर्तब करणारं उद्धव ठाकरेंच पहिलं मोठं विधान, म्हणाले,...

अर्थखात्याचा असुद्धा हाकेला कळत नाही. गुत्त्यावर बसून तो बरळतो. पवार, पाटील, देशमुखांना शिव्या दिल्याने कोणी ओबीसी समाजाचा नेता होत नाही. केवळ दलाली करणे हाच एकमेव उद्योग हाके यांचा आहे. राज्यात तीन पक्षाच्या महायुतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघे मिळून कुठल्या खात्याला किती निधी द्यायचा हे ठरवतात.

राज्याचे उत्पन्न, खर्च आणि आवश्यकता बघून निधी वितरित केला जातो. एवढे प्रारंभिक ज्ञान हाके यांना नाही. केवळ आरोप करून कोणी नेता होत नाही हे हाके यांनी लक्षात ठेवावे. अजित पवार यांना मतदारांनी सर्वाधिक मतांनी निवडूण दिले आहे. हेसुद्धा लक्षात ठेवावे. काही उलटसुलट आरोप करून जनतेमध्ये गैरसमज निर्माण केले जात असतील तर आम्ही शांत बसणार नाही. आठ दिवासात हाके यांनी माफी मागावी अन्यथा काळे फासले जाईल, असा इशारा प्रशांत पवार यांनी दिला.

Laxman Hake Ajit Pawar
BJP Politics : यंदा भाजपचं मोठं टार्गेट, नुसतं नाशिकच नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या चारही महापालिका ताब्यात घेण्याचा निर्धार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com