Uddhav Thackeray : मनसेसोबत युती होणार म्हणजे होणार! यावर शिक्कामोर्तब करणारं उद्धव ठाकरेंच पहिलं मोठं विधान, म्हणाले,...

Uddhav Thackeray MNS Raj Thackeray : संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून बोलावे आणि युतीचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे वक्तव्य केले होते.
Raj-Uddhav Thackeray Alliance News
Raj-Uddhav Thackeray Alliance NewsSarkarnama
Published on
Updated on

MNS-Shivsena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मनसेसोबत युतीची चर्चा सुरू आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करून बोलावे आणि युतीचा प्रस्ताव आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ, असे वक्तव्य केले होते. त्याच्या अवघ्या एका तासातच 'मातोश्री'वर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मनसेसोबत युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, 'जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईल. आम्ही संदेश देणार नाही थेट बातमी देऊ. जे काही बारकावे आहेत त्याबाबत आम्ही बोलतोय. शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही. कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकमेकांच्या संपर्कात आहेत.'

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत चार महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्या सुजाता शिंगाडे यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माध्यमांशीस संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिले.

Raj-Uddhav Thackeray Alliance News
Shambhuraj Desai Ahilyanagar : मंत्री शंभूराज येणार, अन् शिवसेना ठाकरे सेनेचा सुपडा साफ करणार!

संजय राऊत यांनी देखील आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हटले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सकारात्मक आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावेल.

...तर राज ठाकरे 100 पावले पुढे येतील

मनसे नेते अविनाश जाधव युतींच्या चर्चेबाबत म्हणाले की, राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी एक काॅल करावा. उद्धव ठाकरेंनी एक पाऊल पुढे टाकले तर राज ठाकरे 100 पावले पुढे टाकतील. आम्ही लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनातील भावनांचे आदर करतो.

Raj-Uddhav Thackeray Alliance News
Shashi Tharoor Son : अमेरिकेत पत्रकार लेकाकडून अडचणीत टाकणारा प्रश्न, शशी थरूर यांचेही थेट उत्तर!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com