Lok Sabha Election 2024 : नवनीत राणांना राष्ट्रवादी काँग्रेस देणार तगडे आव्हान

Amravati Constituency : महाविकास आघाडीत लोकसभेची जागा सुटणार शरद पवार गटाला
Navneet Rana & Sharad Pawar.
Navneet Rana & Sharad Pawar.Sarkarnama

NCP Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीने ‘45 प्लस’चे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. लोकसभेच्या प्रत्येक जागेवर विजय मिळविण्यासाठी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला चांगलीच ताकद लावावी लागणार आहे. अशात विदर्भातील काही महत्त्वाच्या जागांपैकी एक असलेल्या अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीच्या संभाव्य उमेदवार तथा विद्यमान खासदार नवनीत राणा यांना काट्याची टक्कर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने चालविली आहे.

महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याने या जागेवर उमेदवारी मिळविली. त्यानंतर विजयही मिळविला. विजयानंतर खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा हे भाजपसोबत गेले. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आता राणा यांना आव्हान देणार आहे.

Navneet Rana & Sharad Pawar.
Amravati : प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहेत का?

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या उमेदवार असतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील राणा दाम्पत्याच्या पाठीमागे उभे आहेत. त्यामुळेच महायुतीच्या जिल्हास्तरीय मेळाव्याचे नेतृत्त्व आमदार रवी राणा यांनी केले. महायुतीने अनुकूलता दर्शविल्यामुळे सध्या खासदार नवनीत राणा या मतदार संघाचे व्यापक दौरे करीत आहेत.

नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीतील मार्ग अगदी सोपा आहे, असे नव्हे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार आनंदाराव अडसूळ आणि त्यांचे सुपुत्र माजी आमदार अभिजित अडसूळ व राणा दाम्पत्य यांच्यातून विस्तवही जात नाही. भाजपचे नेते तथा माजी मंत्री प्रवीण पोटे यांच्याशीही राणा दाम्पत्याचे ‘ट्युनिंग’ व्यवस्थित नाही. महायुतीमध्ये असलेले आमदार बच्चू कडू आणि राणा यांच्यात अनेक खटके उडाले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसच्या नेत्या तथा आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके यांच्यासोबतही राणा दाम्पत्याचे मधूर संबंध आहे, असे अजिबात नाही. त्यामुळेच महायुतीच्या मेळाव्यात संधी साधत अनेकांनी राणा यांना संभाव्य धोक्याचे संकेत देऊन टाकले. दिल्ली आणि मुंबईच्या भरोश्यावर राहणे योग्य नाही. एखादी अडचण आल्यास स्थानिक पातळीवर आम्हीच धावणार आहोत, असा सूचक इशारा अनेकांनी राणा यांना देऊन टाकला. त्यामुळे राणा यांचा आमागी लोकसभेतील विजय सोपा नाही, हे तेव्हाच लक्षात आले.

महाविकास आघाडीत अमरावतीची जागा सुरुवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात आहे. यंदाही ती कायम राहणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. अलीकडेच शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असे पवार-कडू सांगत असले, तरी ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या भेटीत शब्दाने काही व्यक्त करण्याची गरज होती का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

Navneet Rana & Sharad Pawar.
Amravati LokSabha constituency : चंदेरी दुनियेतून राजकारणात आलेल्या नवनीत राणा यांचे ग्रह यंदाही चमकणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट महायुतीतून अमरावतीची जागा लढविणार हे ठरले आहे. अशात राणा विरोधी प्रत्येक ‘फॅक्टर’चा राष्ट्रवादी काँग्रेस बारकाईने अभ्यास करीत आहे. महायुती असल्याने खुलेआम जरी शक्य नसले, तरी राणा विरोधकांना पडद्याआड एकत्र आणता येते काय? यासाठी सध्या मोर्चेबांधणी सुरू आहे. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा, विधानसभा या दोन्ही निवडणुकीत पराभव व्हावा अशी अनेकांची ‘दिल से’ इच्छा आहे. त्यामुळे कोणी कितीही पाठबळ दिले, तरी राणा यांच्या विजयाचा मार्ग खडतर असेल हे नक्कीच.

Edited By : Prasannaa Jakate

Navneet Rana & Sharad Pawar.
Loksabha Election : महायुतीच्या मेळाव्यात अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने ठोकला दावा!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com