Vijay wadettivar : राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चेवर वडेट्टीवारांचे मोठे विधान; म्हणाले, 'काँग्रेसला काही फरक...'

vijay wadettiwar statement News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. याकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. शरद पवार यांच्यासोबत असलेल्या अनेक समर्थकांनी तशी इच्छा व्यक्त केली आहे. शरद पवार यांनीसुद्धा याचा निर्णय सुप्रिया सुळे यांना घ्यायचा आहे, आपण त्या निर्णय प्रक्रियेत नसल्याचे सांगितल्याने एकत्रीकरणाच्या चर्चांना आणखीणच उधाण आले आहे.

त्यानंतर आता काँग्रेसचे (Congress) काय होईल, काँग्रेस एकटी पडेल असेही बोलले जात आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आनंद व्यक्त केला. काँग्रेस सोडून सर्व एकत्र येत असतील तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून राहू. काँग्रेसचा जनाधार ठरला आहे. कोणी कुठेही गेले तर काँग्रेसला काही फरक पडणार नाही असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

Vijay Wadettiwar
India-Pakistan Ceasefire : पाकिस्तानने साजरा केला 'यौम-ए-तशक्कूर', शस्त्रसंधीसोबत आहे कनेक्शन

काँग्रेसची विचारधारा मानणारा जनाधार ठरला आहे. काँग्रेस बरोबर असलेले मतदार काँग्रेस सोबतच राहतील. त्यामुळे कोणी सोडून जाणार असेल तर काँग्रेसला फरक पडणार नाही. नेते वापरा आणि फेका अशी नीती भाजपची आहे. कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल. त्यामुळे दुसरा पक्ष त्यांना सोबत घ्यायचा असेल, अशी टीका यावेळी वडेट्टीवार (Vijay vadettivar) यांनी केली.

Vijay Wadettiwar
India Pakistan ceasefire Live : गडचिरोलीत 10,000 क्विंटल धान घोटाळा

याबाबत शरद पवारांची भूमिका काय आहे, यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. एकूणच राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या डावपेचाचा भाग आहे. त्यातून काँग्रेसला कमकुवत करून जनमत प्रादेशिक पक्षाकडे वळवायचे आहे. राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम भाजप करते. काही दिवसांनी प्रादेशिक पक्षाला खतपाणी बंद करतात. यातून दोन्ही उद्देश यातून साध्य होत असतात त्याचा भाग असू शकतो, अशीही शंका वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

Vijay Wadettiwar
India–Pakistan War Live : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचा पाकिस्तानला कडक इशारा

कोल्हापूरमध्ये पक्षांतरावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, 'जेवढा कचरा साफ होईल तेवढा कचरा निघू द्या. ज्यांना सत्तेचा मोह आहे, त्याशिवाय राहू शकत नाही ते जाणारच आहेत. हा कचरा स्वच्छ झाला की नवीन लोकांना संधी येत्या काळात मिळणार आहे.'

Vijay Wadettiwar
India Pakistan war : 8 महिन्यांच्या मुलीसह पत्नीचा जवानाला निरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com