नितीन गडकरी आले अन् भंडारा जिल्हावासीयांना खूष करून गेले…

वैनगंगा नदीवरचा जुना पूल महाराष्ट्रात मंत्री असताना मलाच बांधण्याची संधी मिळाली होती. राम आस्वले तेव्हा आमदार होते. डॉ. कापगतेंना ते माहिती आहे, अशी आठवण गडकरींनी (Nitin Gadkari) सांगितली.
Nitin Gadkari Latest News Updates |Latest Political News in Marathi
Nitin Gadkari Latest News Updates |Latest Political News in MarathiSarkarnama

भंडारा : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी जेथेही जातात, तेथे नवनवीन कल्पना रुजवितात. काल ते भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी भंडारा जिल्हावासीयांसाठी तब्बल तीन योजनांची घोषणा करून नागरिकांची मने जिंकली. भंडाऱ्याच्या ६ पदरी बायपास रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

भंडारा (Bhandara) ते नागपूर (Nagpur) प्रवास करताना लोकांचा पाय जमिनीवर पडणार नाहीत. या दोन शहरांना जोडणारा रोप वे तयार करणार. तांदळाच्या निर्यातीसाठी तुमसर येथे सॅटेलाईट ड्रम पोर्ट आणि गोंदिया ते नागपूर मेट्रो रेल्वे (Metro Train) सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. एकंदरीतच नितीन गडकरी (Nitin Gadkari) आले अन् भंडारा जिल्हावासीयांना खूष करून गेले. भंडारा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी गोसीखुर्द प्रकल्पात पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर आणि भंडाऱ्याच्या दोन टेकड्या जोडत भंडारा-नागपूर हवेत वाहतूक करणारा रोप वे तयार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. (Nitin Gadkari Latest News Updates)

तुमसर येथे रेल्वेच्या जवळ जागा दिल्यास तांदळाच्या निर्यातीसाठी तुमसर येथे सॅटेलाईट ड्रम पोर्ट तयार करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे. त्यामुळे तांदळाचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात तांदळाच्या आयात निर्यातीचा हब बनणार असल्याचे त्यांनी काल सांगितले. नागपूर ते गोंदिया मेट्रो लवकरच सुरू करणार असून १४० किलोमीटर प्रतिघंटा वेगाने ही मेट्रो धावणार आहे. त्यामुळे नागपूर-भंडारा ६० किलोमीटर अंतर केवळ अर्ध्या तासात कापता येणार आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील लोकांना जलद गतीने प्रवास करून वेळ वाचविता येणार आहे.

Nitin Gadkari Latest News Updates |Latest Political News in Marathi
गडकरी म्हणाले, फॉरेस्टवाले निकम्मे आहेत; तुम्ही नावे द्या, त्यांचा सीआर खराब करतो…

गेल्या अनेक वर्षांपासून भंडाऱ्याच्या रिंगरोड करिता खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. माझ्यामागे ते सतत लागले. आज या कामाला मंजुरी मिळाली. लवकरच हे काम सुरू होत आहे. या प्रकल्पावर १०० कोटी रुपये भूमी अधिग्रहणासाठी खर्च झालेले आहेत. ३४१ कोटी रुपयांचा हा रस्ता आहे. यावर अनेक पुल, अंडरपास आहेत. शहरातून जो राष्ट्रीय महामार्ग जात होता, त्यामुळे शहरवासीयांना अडचणीचा सामना करावा लागत होते. वैनगंगा नदीवरचा जुना पूल महाराष्ट्रात मंत्री असताना मलाच बांधण्याची संधी मिळाली होती. राम आस्वले तेव्हा आमदार होते. डॉ. कापगतेंना ते माहिती आहे, अशी आठवण गडकरींनी सांगितली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com