NEET Exam Dummy Candidates : ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ घडवू पाहणाऱ्या आंतरराज्यीय फॅक्टरीचा पर्दाफाश !

Yavatmal Polict : डमी उमेदवार आणि 'मास्टरमाइंड'सह सहा जणांना बेड्या.
Master Mind Naresh Bishnoi
Master Mind Naresh BishnoiSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Crime News : वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ (NEET) परीक्षेत डमी उमेदवार बसवून परीक्षा उत्तीर्ण करून देणाऱ्या आणि पैशाच्या हव्यासातून 'मुन्नाभाई एमबीबीएस' घडवू पाहणाऱ्या आंतरराज्यीय फॅक्टरीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी डमी उमेदवार, परीक्षार्थी आणि मास्टरमाइंडसह एकूण सहा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. (Six arrested including dummy candidate and 'mastermind')

जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी (रा. घुगल बिकानेर), महावीर सिखरचंद नाई (रा. बिकानेर), आकार चंद्रकांत पाटील (रा. कोपरी पालघर) , गजानन मधुकर मोरे (रा. नांदेड), नागनाथ गोविंद दहीफळे (रा. नांदेड), राजीव रामपदारथलाल कर्ण (रा. झारखंड,) नरेश बलदेवराम विष्णोई (रा.जोधपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कार्तिक सुभाष कान्हे (लिपिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ) रा. गोधनी रोड यांनी सात मे २०२३ रोजी यवतमाळ शहर पोलिसांत पोद्दार स्कूलमध्ये नीट परीक्षेत डमी उमेदवार बसविल्याची तक्रार दिली होती. त्यावरून शाळेवर एनटीए दिल्लीमार्फत याबाबत पडताळणी करण्यात आली. यात पालघर जिल्ह्यातील कोपरी पालघर येथील रहिवासी असलेल्या आकार चंद्रकांत पाटील आणि अल्पवयीन बालकाची पुन्हा चौकशी करण्यात आली.

या उमेदवारांच्या जागी राजस्थान बिकानेरच्या नया शहर ठाणे येथील रहिवासी जितेंद्र रामगोपाल गाठचौधरी आणि गया शहरातील रहिवासी महावीर सिखरचंद नाई यांनी नीट परीक्षा दिल्याचे उघड झाले. बनावट प्रवेशपत्र आणि बनावट आधार कार्ड वापरून NEET परीक्षा दिल्या प्रकरणी यवतमाळ शहर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

या गुन्ह्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी तातडीने या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास केल्यानंतर एनईईटी परीक्षेत बसलेल्या डमी उमेदवारांना अटक केली. गुन्ह्याबाबत सविस्तर चौकशी केली असता, त्यांच्याकडून या गुन्ह्यात सहभागी असलेले इतर आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक केली.

मास्टरमाइंड नरेश विरोधात दिल्लीतही गुन्हा...

मुन्नाभाई एमबीबीएस घडविणाऱ्या या टोळीचा मास्टरमाइंड नरेश बलदेवराम बिश्नोई असून, तो दिल्लीत वैद्यकीय शिक्षण घेत आहे. त्याच्यावर दिल्लीतही असाच गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

Edited By : Atul Mehere

Master Mind Naresh Bishnoi
Yavatmal News : कंत्राटी भरतीवरून तरुणांच्या संतापाचा भडका; भीक मागून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले पैसे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com