Yavatmal News : कंत्राटी भरतीवरून तरुणांच्या संतापाचा भडका; भीक मागून मुख्यमंत्री सहायता निधीला दिले पैसे

Contract Recruitment News : राज्य सरकारने अनेक पदांसाठी कंत्राटी भरतीची जाहिरात काढली आहे.
Yavatmal Agitation
Yavatmal Agitation Sarkarnama

सतीश येटरे

Yavatmal : कंत्राटी पदभरतीमुळे कायमस्वरूपी नोकऱ्यांचे सुशिक्षित बेरोजगारांचे स्वप्न बेचिराख झाले आहे. सरकारच्या या धोरणाविरोधात सुशिक्षित बेरोजगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याबाबतचे संतप्त पडसाद आज दुपारी यवतमाळमध्ये उमटले. आव्हान संघटनेच्या नेतृत्वात सुशिक्षित बेरोजगार, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘भीक माँगो’ आंदोलन केले. एवढेच नव्हे तर त्यातून गोळा झालेली रक्कमही मुख्यमंत्री सहायता निधीला भेट देण्यात आली. (Agitation in Yavatmal against contract recruitment)

राज्य सरकारने अनेक पदांसाठी कंत्राटी भरतीची जाहिरात काढली आहे. अनेक विभागांतील पदे कंत्राटी पद्धतीने भरले जात आहेत. या कंत्राटी पदभरतीमुळे युवकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. त्याचा निषेध नोंदविण्यासाठी यवतमाळमध्ये युवकांनी हे आंदोलन केले. भीक मागून गोळा झालेली ३५१ रुपयांची रक्कम स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीला दान करण्यात आली. कंत्राटी धोरणाचा निषेध नोंदवित कायमस्वरूपी पदांची निर्मिती करून बेरोजगारांना न्याय देण्याची आग्रही मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

Yavatmal Agitation
Shahajibapus Tension Increased : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटील यांचे टेन्शन

या आंदोलनात ‘सुशिक्षित बेरोजगार‘ हे घोषवाक्य लिहिलेली टोपी परिधान करून युवक सहभागी झाले होते. त्यात प्रद्युम्न जवळेकर, चंदू पवार, कुणाल कांबळे, पंढरी पाठे, श्रीजित भुते, सूरज पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, आशू पपळे, सात्त्विक बढाये, करण जुनगरे, अंकित डांगे, अतुल गजलवार, ज्ञानेश्वर गायकवाड, नंदू बुटे, प्रा. प्रवीण देशमुख, वैशाली सवई, प्रवीण भोयर, यशवंत इंगोले आदींसह अनेकांनी सहभाग घेतला होता.

राज्यभर आंदोलन पेटविण्याचा इशारा

गेल्या अनेक वर्षांत राज्यात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना प्रभावी नोकरभरती झाली नाही. नुकतीच तलाठी आणि पोलिस पदांसाठी भरती प्रक्रिया झाली. त्यातही अनेक घोटाळे उघडकीस आले. त्यामुळे तलाठी भरती प्रक्रिया रखडली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित आहेत. काही परीक्षांचे निकाल आले. मात्र, काही महिने उलटूनही उत्तीर्णांना नियुक्ती दिल्या नाहीत.

Yavatmal Agitation
Pawar Ambegaon Sabha : पवारांचा शब्द; 'आंबेगावात लवकरच सभा घेणार, मी अन्‌ खासदार कोल्हे सविस्तर बोलणार'

त्यात आता सरकारने कंत्राटी पदभरतीचा निर्णय घेतला आहे. जणू सरकार सुशिक्षित बेरोजगारांच्या मुळावर उठले असल्याचे त्यावरून दिसून येत आहे. त्यामुळे आता सरकारला वठणीवर आणण्यासाठी राज्यभर आंदोलन पेटविण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी या वेळी दिला.

Yavatmal Agitation
Pawar In Ambegaon : वळसे पाटलांच्या आंबेगावातून पवारांचा राष्ट्रवादी बंडखोरांबाबत कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com