Amravati NIA Raid : अचलपूरमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा; एकाला ताब्यात घेतलं

Investigation On : प्रचंड शस्त्रास्त्र असलेल्या 300 पोलिसांचा होता गराडा; मोठा बंदोबस्त तैनात
NIA Raid in Amravati.
NIA Raid in Amravati.Sarkarnama

Achalpur News : राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकांनी (ATS) अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे घातलेल्या छाप्यात एका तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. या युवकाच्या घरातून काही कागदपत्र पथकातील अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे. रविवारी मध्यरात्रीपासून ताब्यात घेण्यात आलेल्या या युवकाची कसून चौकशी केली जात आहे.

अचलपूर येथे मध्यरात्री एनआयएच्या पथकाने छापा घातला त्यावेळी एके-47 बंदुकधारी सुमारे 300 पोलिसांचा ताफा परिसरात तैनात करण्यात आला होता. चारही बाजुनी एकाच वेळी नाकाबंदी करीत परिसरातील सर्व मार्ग सील करण्यात आले. त्यानंतर एनआयएचे तपास पथक युवकाच्या घरात शिरले.

NIA Raid in Amravati.
Amravati News : सरकारजवळ मराठा आरक्षणासाठी केवळ सात दिवसांचाच अवधी

मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेला हा छापा पहाटेपर्यंत सुरू होता. तपास यंत्रणांनी युवकाच्या घरातील सर्वच साहित्याची तपासणी केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेतले. अचलपूर येथे ज्या घरावर छापा टाकण्यात आला, ते घर एका शिक्षकाचे आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव सॅमअली असून तो 19 वर्षांचा आहे. सॅमचे वडिल अहमद अली हे शिक्षक आहेत. आई शिक्षिका आहे. दोघेही जी.एन. शाळेत शिकवतात. कुटुंबातील सर्वच सदस्य सुशिक्षित आहेत.

परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सॅम हा फारसा घराबाहेर जात नव्हाता. त्याला खुपच कमी मित्र आहेत. सॅमच्या परिवाराने सांगितले की, मध्यरात्रीच्या सुमारास काही लोक घरात आलेत. त्यांनी एनआयएचे पथक असल्याची माहिती दिली व सॅमची चौकशी सुरू केली. सकाळपर्यंत चौकशी आणि त्यांची झडती सुरू होती. घराबाहेर सुमारे 300 पोलिस होते. त्यापैकी अनेकांजवळ AK-47 सारखी शस्त्रं होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घराची झडती व चौकशी पूर्ण झाल्यानंतर एनआयएचे पथक सकाळ आठच्या सुमारास सॅमला घेऊन रवाना झाले. आम्हाला याबाबत काहीही सांगण्यात आले नाही. त्यामुळं आम्ही कुणाजवळही वाच्यता करण्याचे टाळले. दुपारनंतर लोकांनी व प्रसार माध्यमांनी आम्हाला याबाबत विचारणा सुरू केली. सॅमसोबत असलेले एनआयएचे पथक अमरावतीच्या जोग क्रीडा संकुलातील पोहोचले आहे. पथकातील अधिकारी त्याची कसून चौकशी करीत आहे. यासंदर्भात स्थानिक पोलिसांनाही फारशी माहिती नाही. एनआयएच्या पथकानेही कुणाला अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सॅमला एनआयएने नेमक्या कोणत्या कारणांमुळे ताब्यात घेतले हे अस्पष्ट आहे.

जोग क्रीडा संकुलाच्या परिसरात व अचलपूरमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. क्रीडा संकुलाच्या ज्या कक्षात एनआयए सॅमची चौकशी करीत आहे, तेथे कुणालाही प्रवेश नाही. त्यामुळं हे नेमकं प्रकरण काय आहे, याबद्दल अद्यापही उलगडा झालेला नाही. अमरावती शहरात काही महिन्यांपूर्वी भीषण जातीय दंगल झाली होती. अलीकडच्या काळात पश्चिम विदर्भातही अनेक ठिकाणी जातीय दंगलीच्या घटना घडल्या आहेत. नागपूर आणि अमरावती येथे मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा पकडण्यात आला आहे. नागपुरातील बाजारगाव येथे रविवारी संरक्षण दलासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या सोलर कंपनीत मोठा स्फोट झाला. त्यात नऊ श्रमिकांचा मृत्यू झाला. त्याचा तपासही एटीएस, सीबीआय, केंद्रीय तथा सैन्यदलातील गुप्तचर यंत्रणांनी सुरू केलाय. यापैकी एखाद्या प्रकरणाशी या छाप्यांचा संबंध आहे काय, अशी चर्चाही सुरू आहे.

Edited by : Prasannaa Jakate

NIA Raid in Amravati.
Amravati News : आध्यात्मिक कार्यक्रमांसाठी भरपूर वेळ; शेतकरी मात्र वाऱ्यावर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com