ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. शिवसेना स्वबळावर लढली तेव्हा जास्त आमदार निवडून आले, असा दावा त्यांनी केला आहे. त्याचवेळी 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी अमित शाहांनी 'मातोश्री'वर लोटांगण घातले होते, या शब्दांत आमदार देशमुख यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे शाहांना भेटायला गेले नव्हते तर शाह भेटायला आले होते, याची आठवण बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी सांगितली.
शिवसेना (Shivsena) आणि भाजप (BJP) यांची युती 2014 मध्ये तुटली. लोकसभा निवडणूक (Loksabha Election) युतीमध्ये झाल्या. पण विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटल्याचे भाजपकडून जाहीर करण्यात आले. त्यानंतर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवून युतीमध्ये जेवढ्या जागा जिंकल्या होत्या, त्यापेक्षा जास्त जागा निवडून आणल्या होत्या, हे सांगतानाच नितीन देशमुख यांनी भाजप आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली.
2019 मध्ये लोकसभा निवडणूक जवळ आली तेव्हा भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, असे निवडणूकपूर्व अंदाज होते. त्यावेळी अमित शाह 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) भेटायला आले होते. तेव्हा लोकसभेसाठी युती झाली, पण पुन्हा शिवसेनेचा घात झाला, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढली आणि जास्त जागा जिंकल्या. त्या अगोदर मोदींचा फोटो लावल्याने शिवसेनेचे नुकसान झाले, आमदार घटले, असा टोला आमदार देशमुख यांनी लगावला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अकोल्यातील भाजपचे चार आमदार शिवसेनेमुळे जिंकून आले, असा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला. या वेळी आमदार देशमुख यांनी चार विधानसभा मतदारसंघांतील आकडेवारीच समोर ठेवली. अकोल्यात महाविकास आघाडीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार नितीन देशमुख यांनी वरील आरोप, दावे आणि वक्तव्ये केली.
(Edited by Avinash Chandane)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.