Uddhav Thackeray Speech : 'मोदींच्या गॅरंटीत फक्त 'टी'... ; चहावरून ठाकरेंनी पंतप्रधानांना डिवचले!

Uddhav Thackeray Speech : "या निवडणुकीत तुमच्या मदतीने भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही,"
Uddhav Thackeray Speech Narendra Modi
Uddhav Thackeray Speech Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्य़ा धाराशिव येथील सभेत भाजप, फडणवीस आणि मोदींवर सडकून टीका केली. भाजपने 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्या सोबतची युती तोडली. त्यानंतरही आम्ही 2019 ला भाजपसोबत गेलो होतो. त्यानंतरही नेहमीच शिवसेनेला संपवण्याची भाषा त्यावेळसपासून भाजपने केली आहे, असा घणाघात ठाकरेंनी केला. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray Speech Narendra Modi
Chitra Wagh ON NCP : 'पवारांना या वयातही फिरावे लागते; पुढची फळी कूचकामी...' ; चित्रा वाघांचा निशाणा!

आमचं हिंदुत्व हे लोकांच्या घरातील चूल पेटवणारे आहे. मात्र, भाजपचं (Bjp) हिंदुत्व मात्र घरे पेटवणारे आहे. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम भाजप करत आहे. सर्व जातीतील धर्मातील लोकांनी एकत्र येऊन, पूर्ण एकजुटीने भाजपच्या हुकूमशाहीला हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे (Uddhav thackeray ) यांनी केले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर 'चहा विक्रीचा धागा पकडत टोला लगावला. 'मोदी अनेक ठिकाणी म्हणतात की, मोदी की गॅरंटी पण मोदींच्या गॅरंटीत फक्त 'टी' आहे, गॅरंटी नाही, असा खोचक टोलाही लगावला.

'आम्ही गद्दारी केल्याने आम्हाला धडा शिकवण्यासाठी मला मुख्यमंत्रिपदावर याच मंडळीने खाली खेचले, असे भाजपवाले (BJP) सांगत असले तरी या हुकूमशाही वृत्तीला अजून धडा शिकवायचा बाकी आहे. या निवडणुकीत तुमच्या मदतीने भाजपला धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही," अशी ही टीका उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray Speech Narendra Modi
Sanjay Raut: BJP त्यांचा गळा कापतेय, तर त्यांच्या गळ्यावर आम्ही कशाला गळा काढू’; कदमांना राऊतांचा टोला

नितीन गडकरींना ऑफर -

भाजपच्या लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी नुकतीच जाहीर झाली. यामध्ये 195 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नव्हते तसेच महाराष्ट्रातील कोणत्याच उमेदवाराचे नाव या यादीतून जाहीर करण्यात आले नाही.

यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, 'ज्यांनी भाजप रुजविण्यासाठी खस्ता खाल्ल्या त्या नितीन गडकरींचं नाव पहिल्या यादीत नाही. नितीनजी सोडून द्या भाजप, या महाविकास आघाडीत आम्ही तुम्हाला निवडून आणतो', अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com