Loksabha Election 2024 : नितीन गडकरींसह विकास ठाकरे अन् श्याम बर्वेंना निवडणूक खर्चाबाबत नोटीस!

Election Commission News : खर्चाच्या तपशीलात तफावत आढळल्याने निर्धारित वेळेत उत्तर सादर करावे लागणार अन्यथा कारवाईची शक्यता!
Gadkari, Thackeray, Barve
Gadkari, Thackeray, BarveSarkarnama

Nagpur and Ramtek Lok Sabha constituencies : सध्या देशभरात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून उमेदवार निश्चिती सुरू आहे. बहुंताश ठिकाणी उमेदवार जाहीर झाले आहेत, तर काही ठिकाणच्या जागांसाठी अद्याप चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असल्याचं चित्र सत्ताधारी महायुती आणि विरोधातीली महाविकास आघाडीत दिसून येत आहे. एकीकडे ही गडबड सुरू असताना दुसरीकडे निवडणूक आयोग आणि प्रशासकीय यंत्रणेनेही निवडणूक कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यासाठी सर्व तयारी केली आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक खर्चावरील देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. तर 19 एप्रिलला विदर्भामधील पाच लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील निवडणुका पार पडत आहेत. शुक्रवारी 5 एप्रिलपर्यंत पहिल्या टप्प्यामधील निवडणू लढवणाऱ्या उमेदवारांना खर्चाचा तपशील सादर करायचा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Gadkari, Thackeray, Barve
Devendra Fadnavis News : "लोकसभेच्या रणधुमाळीत जयंत पाटील कुठे आहेत?" फडणवीसांनी मोजक्या शब्दांतच विषय संपवला

त्यानुसार नागपूर आणि रामटेकमधील लोकसभा मतदारसंघात 9 उमेदवारांकडून सादर झालेल्या खर्चात आणि प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या खर्चात तफावत आढळल्याने, त्यांना नोटीस बजावण्यात आली. एवढंच नाहीतर निर्धारित वेळेत उत्तर न दिल्यास कारवाईचा इशाराही दिला गेला आहे. या उमेदवारांमध्ये महायुतीचे उमेदवार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari), महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे आणि रामटेकमधील महाविकास आघाडीचे उमेदवार श्याम बर्वे यांचा समावेश आहे.

नितीन गडकरींनी सादर केलेल्या खर्चात आणि प्रशासनाच्या खर्चात 13 लाख 63 हजारांची तफावत दिसून आली आहे. गडकरींकडून 4 लाख 75 हजारांच्या आसपास खर्च सादर केला आहे, तर प्रशासनाच्या मते त्यांच्याकडून 18 लाख 38 हजार रुपये खर्च केल्याचे निदर्शनास आले आहे.

Gadkari, Thackeray, Barve
Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदींचा बाप काढला; मुत्तेमवार अडचणीत येणार? भाजपची काय आहे मागणी?

याचबरोबर महाविकास आघाडीचे(Mahavikas Aghadi) उमेदवार विकास ठाकरे यांच्या खर्चात तब्बल 8 लाख 92 हजारांची तफावत आढळली आहे आणि रामटेकमधील उमेदवार श्याम बर्वे यांच्या खर्चात 2 लाख 95 हजारांची तफावत आढळली आहे. याशिवाय रामटेकमधील सात आणि नागपुरमधील दोन उमेदवारांकडून अद्याप खर्चाचा तपशील सादर केला गेलेल नाही. जर या उमेदवारांनी निर्धारित वेळेत प्रतिसाद दिला नाही, तर त्यांच्यावर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाईची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com