Devendra Fadnavis News : "लोकसभेच्या रणधुमाळीत जयंत पाटील कुठे आहेत?" फडणवीसांनी मोजक्या शब्दांतच विषय संपवला

Devendra fadnavis On Mahayuti Seat Sharing : "आम्ही 33 जागा लढू, असा दावा कधीच केला नव्हता," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
jayant patil devendra fadnavis
jayant patil devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil ) यांच्यात जुंपली आहे. जयंत पाटील नाराज आहेत, त्यांना पक्षात कुणी विचारत नाही. एवढी मोठी लोकसभा निवडणूक सुरू आहे. पण, जयंत पाटील कुठे आहेत? असा सवाल उपस्थित करत फडणवीसांनी केला आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

फडणवीसांच्या 'त्या' विधानावरून राजकीय वादंग

"बारामतीची लढाई शरद पवार आणि अजित पवार यांच्यात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यात आहे," असं विधान फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) केलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"बारामतीकर उत्तर देतील"

यावर जयंत पाटील ( Jayant Patil ) म्हणाले, "फडणवीसांचं विधान हास्यास्पद आहे. ही लढाई कोणाच्याविरोधात आहे, हे सगळ्या बारामतीकरांना माहिती आहे. बारामतीकर त्यांचं उत्तर देतील. कदाचित सर्व्हेत मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील लढाई दिसत असेल."

"पाटलांना पक्षात कुणी विचारत नाही"

याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं, "जयंत पाटील नाराज आहेत. त्यांना पक्षात कुणी विचारत नाही. अलीकडील काळात अशा प्रकारची वक्तव्ये ते करत आहेत. लोकसभेसारखी एवढी मोठी निवडणूक सुरू आहे, पण राष्ट्रवादीतील शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार दिसतात. जयंत पाटील कुठे आहेत?"

jayant patil devendra fadnavis
Kalyan Lok Sabha Election 2024 : श्रीकांत शिंदेंचं ‘कल्याण’ फडणवीसच करणार, बहुमताने निवडून आणणार

"मिळालेल्या जागांवर आम्ही समाधानी"

महायुतीच्या जागावाटपावरही फडणवीसांनी भाष्य केलं आहे. "तीन पक्ष बरोबर असल्यानं सगळ्यांचा सन्मान राखणं महत्त्वाचं आहे. आम्ही 33 जागा लढू, असा दावा कधीच केला नव्हता. तिघांचा सन्मान राखून ज्या जागा मिळतील, त्या जागा आपण लढल्या पाहिजेत. त्यामुळे मिळणाऱ्या जागांवर आम्ही समाधानी आहेत," असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.

R

jayant patil devendra fadnavis
Lok Sabha Election: कमळाबाईच्या रिमोट कंट्रोलने..., श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरून काँग्रेसची बोचरी टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com