Nitin Gadkari on Badgujar - ..अन् गडकरी म्हणाले, ''कोण बडगुजर? मी ओळखत नाही, चेहराही बघितला नाही''

Nitin Gadkari on BJP Hindutva हिंदुत्व जीवन पद्धती आहे, भाजपचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, असंही गडकरी यांनी मुलाखतीत बोलून दाखवले आहे.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama
Published on
Updated on

Nitin Gadkari Interview in Nagpur - सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे ते उद्धव ठाकरेंच्या पक्षात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुख्यात दाऊदचा हस्तक म्हणून त्यांच्यावर आरोप केला होता. आता त्यांच्या प्रवेशावरून नाशिक भाजपात दोन गट पडले आहेत. यावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना विचारणा केली असता, ''कोण बडगुजर, मला काही माहीत, मी त्याचा चेहराही बघितला नाही.'' असे सांगून त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

मोदी सरकारने ११ वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या निमित्त भाजपने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अकरा वर्षांत देशांत आणि राज्यात काय विकास झाला? हे जाणून घेण्यासाठी नितीन गडकरी यांच्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर त्यांनी ही मुलाखत घेतली.

भाजपने प्रचंड विकास कामे केली. डबल इंजिन सरकारमुळे हे शक्य झाले असा दावा भाजपचे नेते करीत आहेत. असे असताना इतर पक्षातील व वादग्रस्त नेते भाजपला घेण्याची गरज का भासते ? लोक विकासाला मत देत नाहीत का? अशी विचारणा मुलाखतीत गडकरी यांना केली. यावर गडकरी यांनी ''आपण बडगुजरला ओळखत नाही आणि त्याच्या पक्ष प्रवेशाशी माझा काही संबंध नाही.'' असे त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले.

Nitin Gadkari
Bandatatya Karadkar - ''नक्षलवादाचा आरोप असणाऱ्यांचा वारीत शिरकाव, तातडीने..'' ; बंडातात्यांनी केलं मोठं विधान!

मात्र विकासाच्या प्रश्नावर ते म्हणाले, नक्कीच जनता विकासाला मत देते. आज नागपूरमध्ये पाच वर्षांत पिण्याच्या पाण्यासाठी एकही मोर्चा आला नाही. विजेसाठी मोर्चे काढले जात नाही. तसेच आम्ही नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत आणखीच मोठा विजय मिळवणार असल्याचा दावाही गडकरींनी यावेळी केला.

तर सर्वच विरोधकांना भाजप आपल्या पक्षात घेत असल्याने विरोधात मोर्चा कोण काढणार? असा उलट प्रश्न केला असता त्यावर गडकरी म्हणाले, सुंदर मुलीच्या प्रेमात अनेक लोक पडतात. त्यात मुलीचा काय दोष. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदूचा चुकीचा अर्थ लावला होता असे सांगितले. आमचे हिंदुत्व पुजापाठ किंवा उपासनेशी संबंधित नाही. हा राजकारणाचाही विषय नाही. हिंदुत्व जीवन पद्धती आहे, भाजपचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे.

Nitin Gadkari
Nitish Kumar - बिहार विधानसभा निवडणुकीआधी नितीश कुमारांचा 'मास्टरस्ट्रोक' ; 'हा' मोठा निर्णय घेतला!

याशिवाय, 'ज्या ज्या देशात ५१ टक्के मुस्लिम समाज आहे आणि ज्या देशाने मुस्लिम राष्ट्र घोषित केले त्या देशात लोकशाही, समाजवाद शिल्लक राहिला नाही. भारताने सर्वाधिक संख्या असतानाही हिंदू राष्ट्र घोषित केले नाही. आपल्या देशाचे संविधान आहे आणि संविधानावरच देश सुरू आहे. भारताचा इतिहास बघा किंवा रामायण, महाभारत ग्रंथ बघा. कोणी कोणाच्या धर्माच्या विरोधात नसल्याचे त्यात दिसून येईल. भारतीय, हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व एकाच नाण्याची बाजू असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com