
Nitin Gadkari statement on politics : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या परखड अन् स्पष्टवक्तेपणासाठी सर्वपरिचित आहेत. ते वेळोवेळी आजचं बदलेलं राजकारण, राजकीय नेत्यांची वागणूक, पक्षनिष्ठा आदी मुद्य्यांवरून सर्वच राजकीय नेत्यांना शालजोडीतून लगावत असतात. मग यामध्ये ते भाजपच्या नेत्यांनाही सोडत नाहीत.
आताही नितीन गडकरी यांचं असंच एक वक्तव्य समोर आलं आहे. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा सागर आहे आणि इथे कुणीही समाधानी नाही, असं आता नितीन गडकरींनी म्हटलेलं आहे.
नितीन गडकरी(Nitin Gadkari) एका ठिकाणी बोलताना म्हणाले, मी एकदा राजस्थानच्या विधिमंडळातील कार्यक्रमास गेलो होतो. तेव्हा मी बोलता बोलता सहज असं म्हटलो होतो की, राजकारण हे अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. तेव्हा सगळेच हसायला लागले. मी म्हणालो इथे प्रत्येक व्यक्ती दु:खी आहे आणि आपल्या सध्याच्या पदापेक्षा मोठ्या पदाची अपेक्षा बाळगतो.
याशिवाय त्यांना आपल्या राजकीय जीवनात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या आत्मकथेतील एख उदाहरण आठवतं, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे की, कुणी व्यक्ती तेव्हा नाही संपत, जेव्हा तो हारतो. तो तेव्हा संपतो जेव्हा तो पद सोडतो.
नागपूरमध्ये(Nagpur) 'जीवन के 50 स्वर्णिम नियम' या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. याप्रसंगी गडकरींनी सांगितले की, जीवन हा तडजोडी, जबाबदाऱ्या, मर्यादा आणि विरोधाभासांचा खेळ आहे. कौटुंबिक, सामाजिक, राजकीय किंवा कॉर्पोरेट जीवन असो, जीवन आव्हाने आणि समस्यांनी भरलेले आहे आणि त्यांना तोंड देण्यासाठी "जगण्याची कला" समजून घेणे आवश्यक आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.