Congress News : काँग्रेसमधील पक्षविरोधी कारवाया करणारे नेते रडारवर; नोटिसा पाठवत कारवाईचे संकेत

Political News : महाविकास आघाडीकडून पराभवाचे कारणे शोधली जात आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
Congress Candidates 2024
Congress Candidates 2024Sarkarnama
Published on
Updated on

Congress News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत प्राप्त झाल्याने आता सत्तास्थापनेची जोरदार तयारी सुरु आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या दिल्लीत बैठका झाल्या आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रातही बैठका होणार आहेत. सरकारचा शपथविधी येत्या ५ तारखेला होणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून पराभवाचे कारणे शोधली जात आहेत. त्यातच सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याने राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. (Congress News )

विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून (Congress) पराभवाची कारणे शोधली जात आहेत. त्यामुळे आत्तापासूनच पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. येत्या काळात दोषी आढळणाऱ्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीत पक्षाच्या विरोधात कारवाया करणारे काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यापैकी काही जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

Congress Candidates 2024
Shivsena v/s Shivsena UBT : ठाकरे की आनंद दिघे ? छत्रपती संभाजीनगरात दोन्ही शिवसेना भिडल्या..

राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होऊन आठ दिवस उलटले आहेत. त्यानंतरही सरकार स्थापनेला उशीर होत आहे.त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीनं सरकार स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू आहेत. महायुतीच्या सरकारचा शपथविधी येत्या 5 तारखेला मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे. त्याची तयारी सध्या जोरात सुरु आहे.

Congress Candidates 2024
BJP Legislature Leader : भाजपचे निरीक्षक ठरले; विजय रुपाणी, निर्मला सीतारामन करणार विधिमंडळ गटनेत्याची निवड

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने महाविकास आघाडी (MVA) बॅकफूटला पडली आहे. त्यामुळे मित्रपक्षांनी बैठका घेत, पराभवाच्या कारणांचा शोध आणि पुढील रणनीतीबाबत चर्चांवर भर दिला आहे. त्याचवेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रातील पराभवामुळे कमालीचे नाराज असल्याचे चित्र आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आले आहेत.

Congress Candidates 2024
BJP's Entry in Sugar Belt : समृद्ध साखरपट्ट्यात भाजपचा यशस्वी शिरकाव

निवडणुकीच्या काळात काँग्रेसने पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली होती. आता विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचाच भाग म्हणून एक पाऊल पुढे टाकताना काँग्रेसने अशा स्थानिक नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या विरोधात काम केल्याच्या तक्रारी महाराष्ट्रातील 20 पेक्षा जास्त ठिकाणांहून आल्या आहेत.

Congress Candidates 2024
Kolhapur BJP : महायुतीला दमदार यश मिळूनही बसणार भूकंपाचे हादरे? नाराज भाजप कार्यकर्ते मोठं पाऊल उचलणार

प्रदेश काँग्रेसने ही बाब गांभीर्यानं घेतली असून, या तक्रारींची दखल घेऊन संबंधितांना नोटिसा पाठवल्या जाणार आहेत. आतापर्यंत बंटी शेळके, सूरज ठाकूर यांच्यासह काही जणांना नोटिसाही पाठवल्या आहेत. या नोटिशींना उत्तर त्यांनी दिले नाहीत, तर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Congress Candidates 2024
Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराकडून केंद्रीय मंत्र्यावर आरोप; निवडणुकीत काम न केल्याचा ठपका

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com