BJP Vs Manoj Jarange Patil : मराठा समाजाला 'OBC' तून आरक्षण देण्याची कुणाची हिंमत नाही; भाजप आमदाराच्या विधानानं चर्चेला उधाण

BJP MLA Dr. Parinay Fuke On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण पुन्हा एकदा स्थगित करत सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे.
Manoj Jarange Patil, Parinay Fuke
Manoj Jarange Patil, Parinay PhukeSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News, 24 July : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आमरण उपोषण पुन्हा एकदा स्थगित करत सरकारला आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे.

एकीकडे जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. तर दुसरीकडे त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांनी भाजप नेते आणि फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे आता भाजपने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे.

भाजप (BJP) आमदार प्रसाद लाड यांनी जरांगेंना राजकारण करायचं असेल तर त्यांनी मैदानात येऊन करावं, असा इशाराच दिला आहे. लाड आणि जरांगे यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आता भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी देखील जरांगेंवर सडकून टीका केली आहे. "मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण कोणीही देऊ शकत नाही आणि कोणी ते देण्याची हिंमतही करणार नाही," असं फुके यांनी म्हटलं आहे.

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना आमदार परिणय फुके (Parinay Fuke) म्हणाले, "मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण कुणीही देऊ शकत नाही आणि ते देण्याची कोणी हिंमत देखील करणार नाही. मग ते राज्य सरकार असो वा केंद्र सरकार असो, याबाबतचा अधिकार कोणालाही नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने कोणत्या समाजाला कोणत्या प्रवर्गातून आरक्षण द्यायचं, हे आधीपासून ठरवलेलं आहे.

Manoj Jarange Patil, Parinay Fuke
Manoj Jarange Patil Vs BJP : जरांगेंच्या पाठीशी शरद पवार? भाजप नेत्याचा गंभीर आरोप

त्यामुळे आता एखादा समाज OBC, एससी किंवा एसटीमध्ये दाखल करता येऊ शकत नाही. त्यामुळे जरांगेंनी पुन्हा कायदा, संविधानाचा अभ्यास करायला पाहिजे असं फुके यांनी म्हटलं आहे. फुकेंनी जरांगेंनी भाजप नेत्यांवर केलेल्या आरोपांवर देखील भाष्य केलं. ते म्हणाले, जरांगे वैतागलेले आहेत, आधी त्यांची लोकप्रियता होती ती आता राहिलेली नाही, त्यामुळे ते वैफल्यग्रस्त आहेत त्यामुळे ते अशा प्रकारचं वक्तव्य नेत्यांच्या विरोधात करत आहेत.

Manoj Jarange Patil, Parinay Fuke
Manoj Jarange Patil : मंत्र्यांच्या बैठकीतील इत्यंभूत माहिती जरांगेंपर्यंत पोहोचवणारा ‘तो आमदार’ कोण?

जरांगे यांनी आपलं उद्दिष्ट स्पष्ट केलं पाहिजे. त्यांना खरोखर मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे की, त्यांना काहीतरी मीडियामध्ये यायचं आहे, हे ठरवावं, अशा शब्दात फुके यांनी जरांगेवर टीका केली. त्यामुळे आता फुके यांच्या मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देता येऊच शकत नाही, या वक्तव्यावर जरांगे पाटील काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com