Manoj Jarange Patil : मंत्र्यांच्या बैठकीतील इत्यंभूत माहिती जरांगेंपर्यंत पोहोचवणारा ‘तो आमदार’ कोण?

Mahayuti Minister Meeting In Pandharpur : शासकीय महापूजा झाल्यानंतर पंढरपूरमधील एका नेत्याच्या घरी भाजप आणि शिवसेना मंत्र्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल, मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांच्या अनुंषगाने चर्चा झाली होती.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 July : पंढरपूरमधील सात मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील चर्चा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत एका आमदाराने पोहोचवल्याची माहिती पुढे आली आहे.

भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील चर्चा बाहेर आल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली हेाती. आता मंत्र्यांमधील चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार कोण?, असा प्रश्न चर्चिला जात आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री आणि अनेक आमदार पंढरपूरमध्ये (Pandharpur) विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते. शासकीय महापूजा झाल्यानंतर पंढरपूरमधील एका नेत्याच्या घरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मंत्र्यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल, मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनुंषगाने चर्चा झाली होती.

‘परिस्थिती अशीच राहिली तर भाजपचे 65 ते 79 उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील,’ अशी शक्यता त्या चर्चेत वर्तविण्यात आली होती. त्या बैठकीतील खडान्‌खडा माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती. याबाबतचा गौप्यस्फोट खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी केला होता.

Manoj Jarange Patil
Radhanagri Assembly : कार्यकर्त्यांच्या दबावानंतर राधानगरीसाठी काँग्रेसच्या पहिलवानाने लावली लंगोट; आर. के. मोरेंची विधानसभेसाठी सहमती

भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी त्याबाबतचा गौप्यस्फोट केला होता. ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. एका आमदारानेच ही माहिती दिली आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याचे सकल मराठा समाजाचे सोलापूरचे समन्वयक माऊली पवार यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना दिली.

मंत्र्यांच्या बैठकीतील माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार कोण, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपचे कोण कोणते आमदार जरांगे पाटील यांना भेटले. यावरूनही तो आमदार कोण असावा, याचा अंदाज लावला जात आहे. त्यामुळे जरांगेंना भेटणाऱ्या सत्ताधारी आमदारांकडेही आता वेगळ्या नजरेने पाहिले जात आहे.

Manoj Jarange Patil
Solapur Bazar Samiti : विधानसभेआधी उडणार बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा...

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते?

तुमचे पाच ते सात मंत्री आषाढी एकादशीला पंढरपुरातील एका नेत्याच्या घरी बसले होते. त्यात काही पराभूतही होते. भाजपचे 65 ते 79 उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील. आता काय करावे, अशी चिंता त्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती. त्या बैठकीचे फोटोही मला देण्यात आले आहेत. मुंबईतील भाजपच्या बैठकीत हा विषय पुन्हा झाला होता, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com