निर्णय चुकला, पण न्यायालयाचा सन्मान करतो; वरच्या न्यायालयात जाणार…

न्यायालयाच्या (Court) निर्णयाचे स्वागत करतो आणि न्याय मागण्यासाठी वरच्या न्यायालयात जाणार असल्याचे बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : २०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शपथपत्र सादर करताना मुंबईत (Mumbai) फ्लॅट असल्याची माहिती दडवून ठेवल्याप्रकरणी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिने कारावास आणि २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील चांदुर बाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. हा निर्णय चुकला, पण न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो आणि न्याय मागण्यासाठी वरच्या न्यायालयात जाणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

न्यायालयाने (Court) आज हा निर्णय दिल्यानंतर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, २०१४ च्या पूर्वी आमदारांची एक सोसायटी तयार झाली होती. त्यावेळी शासनाने आमदारांच्या कर्जाची हमी घेतली होती आणि त्यातूनच घरे दिली होती. त्याच घरावर मी कर्ज घेतले होते आणि २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या (Election) वेळी त्या कर्जाची रक्कमही अर्जावर नमूद करण्यात आली होती. नेमकं घर आणि घर क्रमांकाचा उल्लेख त्यामध्ये त्यावेळी करण्यात आला नव्हता. येवढीच काय ती चूक आहे. आपण मुंबईचा फ्लॅट दाखवलेलाच आहे. पण न्यायालयाने आता चुकीचा निर्णय दिला. चुकीचा निर्णय दिला असला, तरी निर्णयाचे स्वागत करतो. कारण न्यायालयाच्या निर्णयाचे सन्मान करायचा असतो.

या प्रकरणात रिपोर्ट चांदुर बाजारला करण्यात आला. गुन्हा दाखल झाला अचलपुरला. तक्रार करणारा आहे चांदुर बाजारचा. यामागची कहाणी अशी आहे की, ज्या ठाणेदाराने एका गरीब माणसाला २० हजार रुपये घेऊन लुबाडले होते. त्या ठाणेदाराला आम्ही आमच्या पद्धतीने शिकवण दिली होती. त्यामुळे त्याने डाव खेळला आणि आसेगावला त्याने तक्रार दाखल करून घेतली. त्यासाठी दुसरा एक विरोधक पकडला आणि हे प्रकरण निर्माण केली. मला २ महिन्यांची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आता वरच्या न्यायालयात जाणार आहे. तेथे न्याय नक्की मिळेल, असा विश्‍वास असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Bacchu Kadu
मुंबईच्या फ्लॅटची माहिती दडवली, राज्यमंत्री बच्चू कडू यांना २ महिन्यांचा कारावास…

सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शपथ पत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती दडवली होती. ही माहिती निवडणूक आयोगापासून दडवणे राज्यमंत्री कडूंना चांगलेच महागात पडले आहे. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी माहितीच्या अधिकारात सदर माहिती मिळवून २०१७ मध्ये कडूंच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मुंबईत ४२ लाख ४६ हजार रुपयांचा फ्लॅट बच्चू कडू यांच्या मालकीचा आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला ही माहिती दिली नाही. भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तपासात मुंबईतील ४२ लाखांचा फ्लॅट बच्चू कडू यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर न्यायालयाने उपरोक्त शिक्षा ठोठावली.

२०१७ मध्ये तक्रार झाल्यानंतर बच्चू कडूंनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घरे उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी बॅंकेकडून ४० लाख रुपयांचे कर्जदेखील देण्यात आले होते. पण कर्जाची परतफेड वेळेत होऊ न शकल्याने तो फ्लॅट विकल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला होता. आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असल्याचा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता आणि आताही वरच्या न्यायालयाचे दार ठोठावणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com