
Nagpur News, 18 Oct : मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांची एकमेकांमध्येच जुंपली आहे. मराठ्यांना ओबीसी समाजाच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी सर्वच ओबीसी नेत्यांचे एकमत आहे. असे असले तरी दुसरीकडे ते एकमेकांना टार्गेटही करीत आहेत.
काल शुक्रवारी (ता.17) बीड येथे झालेल्या ओबीसींच्या मोर्चात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्याला आज वडेट्टीवारांनी जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे. ते म्हणाले, 'भुजबळ सध्या फेक नॅरेटिव्ह पसरवणाऱ्यांच्या फॅक्टरीत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांना मालकाचे गुणगान गावेच लागते, असा टोला त्यांनी लागावला.
महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा-कुणबी अशी असलेल्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र जीआर काढला आहे. या जीआरमुळे मराठ्यांची ओबीसीच्या आरक्षणात घुसखोरी सुरू झाली आहे. हा जीआर रद्द करावा ओबीसी बांधवांचा मोर्चा काढला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद लाभला.
त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे मला टार्गेट करण्यासाठी भाजपने भुजबळांना सोडले आहे. माझा जो व्हीडीओ भुजबळांनी दाखवला त्यामुळे मी ओबीसी मार्चातच भूमिका स्पष्ट केली आहे. तेव्हा मी विरोधी पक्षनेता होता. जरांगे उपोषणाला बसले होते. तेव्हा मराठवाड्यात मराठा-कुणबी अशा फक्त 2800 नोंदी होत्या. त्यामुळे जी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला होता.
यास माझा आजही विरोध नाही. मात्र नव्या जीआरच्या माध्यमातून हजारो मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसवल्या जात आहे. रोज हजार जात प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. त्यामुळे माझा या जीआरला विरोध आहे. त्यामुळे मी ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. त्यातून मराठ्यांना आरक्षण द्यावे असे मत मांडले होते.
मात्र माझा व्हीडीओ कट केला. तो अर्धवट दाखवून ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. संभ्रम निर्माण केला जात असल्याचे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले. भुजबळ ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. ओबीसी आरक्षणावर त्यांची आणि माझी भूमिका एकच आहे. मी त्यांना कधीच क्रॉस केले नाही. त्यांच्या भूमिकेवर शंकासुद्धा घेतली नाही.
आमची मूळ मागणी मराठ्यांना कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र देण्यासाठी काढण्यात आलेला जीआर रद्द करा ही आहे. ते महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी विरोध केला आहे. त्याबद्दल त्यांचे आभार. मात्र ते मला का टार्गेट करीत आहेत हे कळत नाही. कदाचित ते सध्या ज्या फॅक्टरीत काम करीत आहे त्यांचा आदेश पाळत असावे.
त्यांनी भुजबळांना माझ्या अंगावर सोडल्याचे दिसते. भुजबळ आणि जरांगे दोघेही मला टार्गेट करीत असतील आणि शिव्या देत असतील तर आनंदच आहे. समाजासमाजात आणि आपसात भांडणे लावणे हा भाजपचा धंदाच असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.