OBC Reservation : महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढाई लढणार; ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी अखेर काँग्रेस मैदानात

Vijay Wadettiwar OBC Reservation : 'राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या जीआरमध्ये पात्र असा शब्द वापरला होता. मात्र, दुसऱ्या जीआरमधून तो शब्द काढून टाकला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो.'
Congress leader Vijay Wadettiwar
Congress leader Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 07 Sep : मागील काही दिवसांपासून मराठा आणि ओबीसी वादावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. राजकीय पक्षांकडून दोन्ही समाजाला खुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी काँग्रेस थेट रस्त्यावर उतरणार असल्याचं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे मूळ ओबीसी समाजावर अन्याय होत असल्यामुळे ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार अशल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. नागपुरात शनिवारी विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यातील ओबीसी संघटनांची बैठक पार पडली.

यानंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य सरकारने मराठा समाजाला ओबीसींतून आरक्षण देण्यासाठी काढलेल्या पहिल्या जीआरमध्ये पात्र असा शब्द वापरला होता. मात्र, दुसऱ्या जीआरमधून तो शब्द काढून टाकला. याचा अर्थ मराठा समाजाला ओबीसींतून सरसकट आरक्षण देणार असा होतो.

Congress leader Vijay Wadettiwar
Maharashtra Politics : CM फडणवीसांच्या पेपरमधील 'त्या' जाहिराती कोणी दिल्या? रोहित पवारांचा खळबळजनक खुलासा म्हणाले, "भाजपने नव्हे तर, मित्रपक्षातील..."

त्यामुळे हा मूळ ओबीसींवर अन्याय असून याविरोधात लढा देण्यासाठी 25 प्रमुख लोकांची एक समिती गठीत करून ऑक्टोबरमध्ये नागपुरात ओबीसींचा महामोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच ओबीसींसाठी लढताना अनेकदा आर्थिक चणचण जाणवते. पण, नेत्यांना ओबीसींची भीती वाटू लागताच ही अडचण आपोआप दूर होईल.

ओबीसींच्या लढ्यासाठी प्रसंगी हात पसरू पण न्यायालयीन लढाईसाठी कुठेही आर्थिक अडचण येऊ देणार नाही, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी शासनाने काढलेल्या जीआरमुळे ओबीसींचे नक्कीच नुकसान होणार आहे. 27 टक्के आरक्षणातून 13 टक्के आधीच वजा होते. उरलेल्या 19 टक्क्यांतही मराठा समाजाला आरक्षण दिल्यास ओबीसींना किती उरणार? असा सवाल करत कुणी कुठल्याही पक्षाचा असला तरी आपल्यासाठी झटणाऱ्याला साथ द्या, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

Congress leader Vijay Wadettiwar
Dhananjay Munde : "मागे जे घडलं ते सांगायलाही मला लाज वाटते..." बीडमधील सामाजिक परिस्थितीवर धनंजय मुंडे पहिल्यांदाच भरभरून बोलले

दरम्यान, नागपुरात येत्या 12 सप्टेंबरला प्रमुख ओबीसी नेत्यांची बैठक होणार असून पहिली लढाई न्यायालयीन स्तरावर लढली जाईल. विदर्भातून वकील संघटना पूर्ण ताकदीने न्यायालयात ओबीसींची बाजू मांडणार आहेत. तर दुसरा लढा आंदोलनाच्या माध्यमातून केला जाईल, कुणावरही अन्याय होऊ नये ही आमची भूमिका असली तरी ओबीसींच्या आरक्षणाला देखील धक्का लागू नये ही पण आमची भूमिका असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com