OBC Andolan News : ओबीसी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पाठवली रक्ताने लिहिलेली पत्रे

Eknath Shinde News : उपराजधानी नागपुरातील संविधान चौकात गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे.
OBC students
OBC students Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उपराजधानी नागपुरातील संविधान चौकात गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी समाजाचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने आरक्षणासह विविध 15 मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ओबीसी समाजातील नेत्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. या चर्चेचे पत्र राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांना प्राप्त झाले आहे. या पत्रानंतरही चंद्रपूर आणि नागपुरात ओबीसींचे आंदोलन सुरूच असून, शनिवारी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रक्ताने लिहिलेली पत्रे पाठवली आहेत.

ओबीसी विद्यार्थ्यांना ७२ वसतिगृह मिळालेच पाहिजे, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन मागण्या रक्ताने लिहून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना ई-मेलने पाठवण्यात आल्या आहेत. या आंदोलनात विद्यार्थी नेते ऋषभ राऊत, नीलेश कोढे, विनोद हजारे, श्रीकांत मसमारे, रुतिका डाळ मसमारे, शुभम वाघमारे, रितेश कढव, पराग वानखेडे, यश हजारे, राजू मोहोड, खुशी ईरुगकर, खुशबू घारपुरे, हिमाशी दियेवार, आचल पेंदाम, नयन भिवगडे यांनी सहभाग घेतला.

OBC students
Chandrashekhar Bawankule News : बावनकुळेंच्या विधानावर पटोले भडकले; म्हणाले, 'येड्या सरकारचे लोकप्रतिनिधी पत्रकारितेला खरेदी करू पाहत...'

संविधान चौकातील आंदोलन स्थळाला शनिवारी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी भेट दिली. ओबीसींच्या सर्व संवैधानिक मागण्यांचे त्यांनी या वेळी समर्थन केले. राज्य सरकारने ओबीसी समाजालाच चर्चेसाठी बोलावले असले तरी नागपूर संविधान चौकात साखळी उपोषण सुरूच राहणार आहे.

आज साखळी उपोषणात सो. क्ष. कासार, शरद भांडेकर, अशोक धोटे, अनिल नागपूरकर यांनी पाठिंबा दिला. डॉ. दिलीप बारहाते, प्रवीण डेहनकर, डॉ. अनंत बरडे, हेमंत गावंडे, केशव शास्त्री, पांडुरंग शिंगणे, वसंत राऊत, दौलत शास्त्री, भाऊराव कापसे, नारायण मांगे, अशोक चिंचे, घनश्याम मांगे, शरद वानखेडे, सुभाष घाटे, डॉ. अरुण वराडे, नीलेश कोढे, पराग वानखेडे, डॉ. राजीव गोसावी या १९ व्यक्तींनी सहभाग घेतला.

'सरकारनामा'च्या त्या वृत्ताची चर्चा

युवा सेना अध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान ओबीसींच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली. या संदर्भातील वृत्त 'सरकारनामा'ने प्रकाशित केले होते. या वृत्ताची चर्चा ओबीसी समाजाच्या आंदोलन स्थळी शनिवारी होती. उपराजधानी नागपूर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी उपोषणस्थळी येऊन ओबीसी समाजाशी चर्चा करायला हवी होती, अशी अपेक्षा नेत्यांनी रविवारी व्यक्त केली.

Edited by : Amol Jaybhaye

OBC students
Shirur Lok Sabha News : शिरूर लोकसभेत पवारांना, पवारांकडूनच हादरा बसणार,भाजपचं मेगा प्लॅनिंग

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com