OBC Wadettiwar News : इतिवृत्त न दिल्याने सरकारचा निषेध, आज वडेट्टीवारांच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होणार !

OBC Community : कुठल्याही स्थितीत मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये.
OBC Meeting Chandrapur
OBC Meeting ChandrapurSarkarnama
Published on
Updated on

Nagpur OBC Political News : राज्यात मराठा, ओबीसी आरक्षणावरून रणकंदन माजले आहे. मराठ्यांचा ओबीसीत समावेश करून कुणबी प्रमाणपत्र द्यावे, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला तर कुठल्याही स्थितीत मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये, अशी भूमिका ओबीसी संघटनांनी घेतली आहे. (Under no circumstances should Marathas be included in OBC)

याच मुद्द्यावर काल (ता. १५) चंद्रपुरात ओबीसी संघटनांची बैठक पार पडली. यात सरकारने अद्यापही मागण्या मान्य केल्याचे इतिवृत्त दिला नसल्याने सरकारचा निषेध करण्याचा ठराव घेण्यात आला. राज्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजात जनजागृती व्हावी, याकरिता येत्या एक नोव्हेंबरपासून भेटी-गाठी जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.

तब्बल २२ दिवस आमरण उपोषण करणारे रवींद्र टोंगे, विजय बल्की, प्रेमानंद जोगी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर रवींद्र टोंगे यांच्या वेंढली गावापासून जनजागृती अभियानाला सुरुवात करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये जनजागृती करून चिमूर येथे या अभियानाचा समारोप करण्यात येणार आहे. ओबीसी समाजाचे आमदार, खासदार व मंत्र्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यांना ओबीसींसाठी भूमिका घेण्यास बाध्य करणार असल्याची माहिती सचिन राजूरकर यांनी दिली.

सरकारच्या निषेधाचा ठराव...

रवींद्र टोंगे यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करू नये, यासह अन्य मागण्यांसाठी तब्बल २२ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. यानंतर २९ सप्टेंबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ओबीसी शिष्टमंडळाच्या उपस्थितीत संपूर्ण मागण्या मान्य करीत असल्याचे सांगण्यात आले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा टोंगेंचे उपोषण सोडवायला चंद्रपुरात आले, तेव्हा त्यांनी सर्व मंजूर मागण्याचे इतिवृत्त प्रकाशित करण्याचे आश्वासन दिले, पण अद्यापही ते काम सरकारने केले नाही. त्यामुळे कालच्या बैठकीत सरकारचा निषेध करण्याचा ठराव घेण्यात आला.

आज नागपुरात बैठक...

सध्या ओबीसींसाठी संकटाचा काळ आहे. अशावेळी ओबीसींनी एकसंघ राहण्याची आवश्यकता आहे. आपण केवळ आपल्या जातीचे झेंडे घेऊन विभागलो जात आहोत. याचाच फायदा सत्ताधारी घेत आहेत. आपण आताही एकत्रित आलो नाही, तर आपल्या आरक्षणावर आघात झाल्याशिवाय राहणार नाही, असे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

राहुल गांधी यांनी जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला आहे. दरम्यान, ओबीसींच्या एकत्रीकरणासाठी विजय वडेट्टीवार यांनी आज नागपुरातील रविभवन येथे बैठक बोलाविली आहे. यात संपूर्ण ओबीसी संघटनांनी सहभागी घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ही बैठक थोड्या वेळात सुरू होणार आहे. दरम्यान, दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून पुन्हा नव्या दमाने ओबीसीची मोट बांधूया, असे वडेट्टीवार म्हणाले.

Edited By : Atul Mehere

OBC Meeting Chandrapur
Maratha Vs OBC Community : जरांगे पाटलांच्या इशाऱ्यानंतर ओबीसी समाज ‘अलर्ट’ मोडवर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com