Vidarbha News : कोराडी महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या सचिवांचा मोठा खुलासा; म्हणाले, '2014 मध्ये बावनकुळेंना...'

Chandrashekhar Bawankule Politics : श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या सचिवांनी मोठा खुलासा केला आहे. सचिव दत्तू समरितकर म्हणाले, ही संस्था बावनकुळे यांची मालकीची नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Mahayuti Vs Mahavikas Aghadi : विदर्भातील कामठी तालुक्यातील श्री क्षेत्र कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाने 2023 मध्ये महादुला (ता. कामठी) येथील सेवानंद विद्यालयाच्या विकासाची जबाबदारी एकमताने घेतली होती. या शाळेच्या विकासासाठी संस्थानने एकमताने आराखडा तयार केला होता. त्यासाठी 5.04 हेक्टर जमिनीची आवश्यकता होती.

महालक्ष्मी जगदंबा मंदिर संस्थान ट्रस्टचे सचिव दत्तू समरितकर यांनी तसा प्रस्तावही राज्य सरकारकडे पाठवला होता. शासनाने त्यावर निर्णय घेतला आणि सेवानंद विद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज सुरू करण्यासाठी 5.04 हेक्टर जमीन दिली. पण या जमिनीवरुन संस्थानकडून मोठा खुलासा केला आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानच्या सचिवांनी मोठा खुलासा केला आहे. सचिव दत्तू समरितकर म्हणाले, ही संस्था बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची मालकीची नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हा भूखंड राज्य सरकारने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी दिला असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला आहे. भूखंडासाठी संस्थानच्यावतीने 1 कोटी 46 लाख रुपये सरकारकडे भरण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

Chandrashekhar Bawankule
Rashmi Barve Vs Devendra Fadnavis : रश्मी बर्वे यांनी डागली फडणवीसांवर तोफ; म्हणाल्या, 'देवाभाऊ कधीतरी..'

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान, कोराडी धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत संस्था आहे. संस्थानला महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून 'ब' दर्जा देण्यात आला आहे. ट्रस्टमध्ये एकूण 15 विश्वस्त आहेत. 2014 मध्ये विश्वस्त मंडळाने एकमताने चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वस्त मंडळात घेतले होते. विश्वस्त मंडळाच्या निवडणुकीत त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. बावनकुळे हे अध्यक्ष असून विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहे.

महादुला येथील सेवानंद विद्यालय शाळेच्या विकासासाठी जबाबदारी महालक्ष्मी जगंदबा संस्थाच्या विश्वस्त मंडळाने घेतली आहे. महाविद्यालयाच्या विकासाचा आराखडा तयार करून त्यासाठी लागणाऱ्या 5.4 हेक्टर जमिनीची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती. त्यावर राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. उपलब्ध जमीन सेवानंद महाविद्यालयाच्या शैक्षणिक विस्तारासाठी वापरल्या जाणार असल्याचेही सचिवांनी स्पष्ट केले आहे.

Chandrashekhar Bawankule
Prashant Pracharak : ...म्हणून प्रशांत परिचारक हाती 'तुतारी' घेणार असल्याच्या चर्चांना तूर्तास तरी पूर्णविराम!

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ट्रस्ट हे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यसुद्धा करते. कोराडी येथील मंदिरामध्ये अन्नछत्रासोबतच भाविकांसाठी विविध उपक्रम राबवले जाते. संस्थेने सामाजिक भावनेतून शैक्षणिक क्षेत्रातही काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेचा उद्देश नफा कमविणे नसून होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याचा असल्याचे सचिव दत्तू समरितकर यांनी म्हटले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com