
Nagpur News : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजपच्या मंत्र्याकडे पक्षातर्फे एक ओएसडी नेमण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला आहे. संघातर्फे ओएसडी नेमला जाणार असून मंत्र्यांच्या कारभारावर त्यांच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राज्यात सुरू आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
कार्यकर्त्यांची कामे व्हावीत आणि संघाच्या ज्या काही योजना आहेत त्यासुद्धा राबवता याव्या, यासाठी यंत्रणा उभी केली जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. संघातर्फे नजर ठेवण्याचा किंवा सरकारच्या कारभारात हस्तक्षेपाच्या बातम्या त्यांनी धुडकावून लावल्या.
लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी एका मुलाखतीत आम्हाला आता संघाच्या मदतीची आता गरज राहील नाही, भाजपचे नेटवर्क मोठे असल्याचे सांगितले होते. त्यावरून मोठे वादळ भाजप आणि संघात निर्माण झाले होते. त्यानंतर ‘अबकी बार चारसो पार’चा आकडा भाजपला गाठता आला नाही. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसह विरोधकांनाही संघाच्या कामाची प्रशंसा करणे सुरू केले. यात शरद पवार यांचाही समावेश आहे.
महायुतीच्या विजयात संघाचे मोठे योगदान असल्याचे अनेक नेत्यांनी सांगितले आहे. आता ओएसडीच्या माध्यमातून संघातर्फे सरकारवर कंट्रोल ठेवत असल्याचे बोलले जात आहे. मात्र बावनकुळे यांनी या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर लोकसभेपर्यंत भाजप निवडणूक लढते. प्रचाराच्या दरम्यान पक्षाच्यावतीने कार्यकर्तेसुद्धा मतदारांना काही आश्वासने देत असतात. स्थानिक समस्या सोडवल्या जातील असे सांगितले जाते. कार्यकर्त्यांनी दिलेल्या आश्वासनांची दखल घेतली जावी आणि स्थानिकांनी सुचवलेली विकास कामे व्हावी याकरिता भाजपच्या मंत्र्यांकडे ओएसडी नेमले जाणार आहेत, असे बावनकुळेंनी सांगितले.
स्थानिक लोक कामे घेऊन संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या ओएसडीकडे देतील. ती कामे व्हावीत हा या मागचा उद्देश आहे. आदिवासी गावे, ग्रामीण भागात संघ काम करीत असते. त्यांच्याही कामांचा यात समावेश राहणार आहे. एवढेच नव्हे तर आम्ही सर्व मंत्र्यांनी शंभर दिवसांचे टार्गेट घेतले आहे. आमचा एक मंत्री नेमून दिलेल्या गावात मुक्कामसुद्धा करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पालकमंत्री या नात्याने नागपूर शहराचा विकास आराखडा तयार करण्यासह काय महत्त्वाची कामे केली जाणार आहे हेसुद्धा बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. यापैकी सेंट्रल जेल हलवणे, मोठ्या जिल्ह्यांमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची निर्मिती, आमदार निवासाचे नूतनीकरण, नव्या इमारतींचे बांधकाम आदींचा समावेश असल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.