सतीश उकेंविरूद्ध जमिनी बळकाविण्यासह इतर गुन्हे दाखल…

महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या विरोधात संपत्ती हडपण्यासंबंधी अजनी पोलिस ठाण्यात एफआयआर केला आहे. यात अ‍ॅड. सतीश उके, (Satish Uke) त्याचा भाऊ प्रदीप उके आणि खैरूनिसा शेख हकिम हे आरोपी आहेत.
Ad. Satish Uke
Ad. Satish UkeSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : कॉंग्रेस (Congress) नेत्यांची वकिली करणारे नागपुरातील (Nagpur) वकील ॲड. सतीश उके यांच्या घरी आज पहाटे ५ वाजता ईडीने धाड टाकली. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एका जमीन बळकावण्याच्या प्रकरणात ईडीने ताब्यात घेतल्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर भाजप (BJP) नेत्यांनी सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप उके कुटुंबीयांनी केला आहे. सतीश उकेंच्या विरोधातही जमिनी बळकावण्यासह इतर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.

सतीश उकेंच्या (Ad. Satish Uke) विरोधात जमिनी बळकाविण्याचे अनेक आरोप आहेत. अगदी अलीकडे २७ जानेवारी २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या विरोधात संपत्ती हडपण्यासंबंधी अजनी पोलिस ठाण्यात एफआयआर केला आहे. यात अ‍ॅड. सतीश उके, त्याचा भाऊ प्रदीप उके आणि खैरूनिसा शेख हकिम हे आरोपी आहेत. खोटी कागदपत्र तयार करणे आणि त्यामाध्यमांतून यंत्रणांना ब्लॅकमेल करणे, हा त्याचा मुख्य व्यवसाय असल्याचे बोलले जाते. याही प्रकरणात खोटे निकाहनामे आणि इतर खोटी कागदपत्र त्याने तयार केली असल्याचे सांगितले जाते. २००५ मध्येसुद्धा जमीन बळकाविण्याचा गुन्हा नागपुरातील सदर पोलिस ठाण्यात दाखल आहे. भादंविचे २९४, ३०८, ३८४, ४२०, ४२३, ४२४, ४४७, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ५०६ बी, ३४, ५०६ असे गुन्हे त्याच्यावर असून, एकूण ८ एफआयआर दाखल आहेत. हे सारे एफआयआर सदर, सोनेगाव, गिट्टीखदान, सीताबर्डी, कोराडी आदी पोलिस ठाण्यात आहेत.

न्यायालय अवमाननेचेही आरोपी..

६ जून २०१६ रोजी उच्च न्यायालयाने सतीश उकेंच्या विरोधात न्यायाधीश, न्यायव्यवस्था, संवैधानिक पदावरील व्यक्ती यांच्या विरोधात केलेल्या आरोपां विरोधात न्यायालय अवमाननेची कारवाई प्रारंभ केली. २८ फेब्रुवारी २०१७ : न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. झेड. ए. हक यांनी सतीश उकेंना न्यायालय अवमानने संदर्भात दोन महिन्यांची शिक्षा ठोठावली. या संपूर्ण खटल्याची व्हीडिओग्राफी करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांपर्यंत सतीश उके बेपत्ता होता. ८ ऑगस्ट २०१७ : सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रंजन गोगोई आणि न्या. नवीन सिन्हा यांनी हायकोर्टाने दिलेली ही शिक्षा कायम केली. २६ ऑक्टोबर २०१७ : सतीश उकेंचा एकूणच व्यवहार पाहता त्याची शिक्षा वाढविण्यात का येऊ नये, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने उपस्थित केला.

Ad. Satish Uke
फडणवीसांच्या विरोधात खटला दाखल करणारे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात

७ फेब्रुवारी २०१८ : सर्वोच्च न्यायालयाने सतीश उकेंला उच्च न्यायालयाची माफी मागण्यासाठी शेवटची संधी दिली. याच प्रकरणात सुबोध धर्माधिकारी आणि अ‍ॅड. फिरदोज मिर्झा यांची ‘अमायकस क्युरी’ म्हणून नियुक्ती केली. २३ जानेवारी २०१९ : उच्च न्यायालयाने त्याची माफी नाकारली आणि ही शिक्षा टाळण्याची पळवाट असल्याचे आणि माफी सुद्धा प्रामाणिक नसल्याचे निरीक्षण नोंदविले. २४ फेब्रुवारी २०२० : सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. त्यात के. आर. विश्वनाथन यांची ‘अमायकस क्युरी’ म्हणून नियुक्ती झाली. तेव्हापासून पुढील सुनावणी प्रलंबित आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात दाखल केलेली निवडणूक याचिका उच्च न्यायालयाने पूर्वीच फेटाळली आहे. पण, अलिकडेच आणखी एक याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com