BJP vs Congress : भाजपचा धुव्वा, विद्यमान मंत्री अन् आमदारालाही दणका : क्लिन स्वीप देत 'काँग्रेसने' जिंकल्या सगळ्या जागा

यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे.
Congress bjp
Congress bjpSarkarnama
Published on
Updated on

यवतमाळ : जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा धुव्वा उडवत काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. 18 पैकी तब्बल 17 जागा जिंकत काँग्रेस आणि खेतानी-मानकर गटाने एकहाती वर्चस्व राखले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. भाजपचे मंत्री अशोक उईके, विद्यमान आमदार राजू तोडसाम आणि माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांना हा पराभव म्हणजे मोठा धक्का मानला जात आहे.

पांढरकवडा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके, भाजपचे विद्यमान आमदार राजू तोडसाम आणि माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. काँग्रेस, सलीम खेतानी-निमीष मानकर यांच्या गटाने भाजपपुढे तगडे आव्हान निर्माण केले होते. भाजपला काँग्रेसमधील असंतुष्टांचीही साथ मिळाली होती. निवडणूक जिंकण्यासाठी दोन्ही गटाकडून साम-दाम-दंड-भेद अशी सर्व शक्ती पणाला लावल्याचे बोलले गेले.

निवडणूक जाहीर होताच आपल्या भागातील बाजार समितीवर आपली सत्ता असावी, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. आमदारापासून तर बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी मतदार संघ पिंजून काढला होता. बाजार समितीसाठी शनिवारी (7 जून) मतदान झाले. मतदानानंतर मतमोजणी झाली. यात अगदी सुरुवातीपासूनच काँग्रेस, निमीष मानकर-सलीम खेतानी गटाचे वर्चस्व दिसून आले. अखेरीस निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने 18 पैकी तब्बल 18 जागेवर विजय मिळविला. एक जागा अपक्षाला मिळाली.

Congress bjp
BJP vs Congress : परदेशात फिरणाऱ्या राहुल गांधींकडून मतदारांचा अपमान; भाजप मंत्री विखेंनी सुनावलं

काही मतदार संघात मतदान अत्यंत चुरशीने झाले होते. एका मतदार संघात दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाली. यामुळे फेरमतमोजणी घ्यावी लागली. यातही काँग्रेस खेतानी-मानकर गटाचे हरिहर लिंगणवार विजयी झाले. त्यामुळे भाजप आणि अण्णासाहेब पारवेकर गटाला बाजार समिती निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. मंत्री, पालकमंत्री, आमदार सगळे भाजपचे असूनही भाजपलाच सपाटून मार खावा लागला. अण्णासाहेब पारवेकर यांचा शब्दही इथे प्रमाण मानला जातो. पण त्यांनाही करिश्मा दाखवता आला नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com