
Sindhudurg1 News : कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सध्या ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन शिवधनुष्य जोमात आहे. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाला जोरदार धक्के बसत आहेत. रत्नागिरीत माजी आमदार राजन साळवींसह इतर दोन माजी आमदार आणि शेकडो कार्यकर्ते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यामुळे शिवसेना मोठा धक्का मानला जात असतानाच भाजपने देखील ठाकरे गटाला जोर का झटका दिला आहे. ओरोस येथे आयोजित कुडाळ तालुका भाजप मेळाव्यात कुडाळ उपनगराध्यक्ष, काँग्रेसच्या दोन नगरसेविकांसह 600 जणांनी हातात कमळ घेतले आहे.
शिवसेनेनं रत्नागिरीत ठाकरेंना झटका दिलेला असताना भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्गात मोठा धमाका केला आहे. रविंद्र चव्हाण प्रमुख उपस्थितीत ठाकरेंच्या नगरसेवकांनी हातात कमळ घेतले आहे. यात कुडाळमधील ठाकरेंच्या 7 नगरसेवकांसह काँग्रेसच्या 2 नगरसेवकांचा समावेश आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरेंच्या पक्षाला कोकणात गळती लागताना दिसत आहे.
यावेळी पक्षाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, पक्षाचे राज्य उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्यासह भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, अॅड. अजित गोगटे, अशोक सावंत, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, राजू राऊळ, महेश सारंग, संध्या तेरसे, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, महिला अध्यक्षा आरती पाटील, ओरोस मंडळ अध्यक्ष सुप्रिया वालावलकर, रुपेश कानडे, पप्या टवटे आदी उपस्थित होते.
भाजपचा हा मेळावा ओरोस सावंतवाडा येथील भवानी मंदिर नजीकच्या पटांगणावर झाला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे सर्व नगरसेवक, काँग्रेसच्या दोन्ही नगरसेविका यांच्यासह ‘महाविकास’चे ६०० पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
देवगड जामसंडे नगरपंचायतमधील ठाकरे शिवसेनेचे गटनेते बुवा तारी, नगरसेवक संतोष तारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कुडाळ नगरपंचायतचे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष आफरिन करोल, अक्षता खटावकर, ठाकरे शिवसेनेचे विद्यमान उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर, ज्योती जळवी, सई काळप, श्रेया गवंडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
याच बरोबर कुडाळ पंचायत समितीच्या माजी सभापती शिल्पा घुर्ये, आंब्रड जिल्हा परिषद मतदार संघाच्या माजी सदस्य कल्पिता मुंज, आबा यांच्यासह शिवसेनेच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामध्ये युवा कार्यकर्ते छोटू पारकर, उदय जांभवडेकर, सुनील जाधव, ग्राम पंचायत सदस्य योगेश तावडे, अमित भोगले यांच्यासह सुशील निब्रे, संजय परब, दिनेश जैतापकर यांचा यात समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.