Parinay Phuke Vs Nana Patole : परिणय फुके पुन्हा नाना पटोले यांच्याशी भिडणार?

Vidarbha BJP Vs Congress : आता प्रफुल पटेल महायुतीत सहभागी झाले आहे. भविष्यात एक जागेवरून वाद टाळण्यासाठी फुके यांना आधीच विधान परिषदेत पाठवण्यात आले आहे.
Nana Patole and Dr. Parinay Fuke
Nana Patole and Dr. Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत भिडणारे माजी राज्यमंत्री परिणय फुके यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकत्व सोपवून भाजप पुन्हा काँग्रेससमोर तगडे आव्हान उभे करण्याची शक्यता आहे.

नागपूरमध्ये नगरसेवक असताना परिणय फुके (Parinay Phuke) यांना भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधान परिषदेवर पाठवण्यात आले होते. त्यावेळी प्रफुल पटेल यांचे या जिल्ह्यात वर्चस्व होते. त्यांचे विश्वासू माजी आमदार राजू जैन यांनाच त्यांनी उमेदवारी दिली होती. पक्षीय संख्याबळ बघता जैन आरामात निवडून येतील असा अंदाज होता.

हे बघून भाजपकडून येथून लढण्यास कोणीच तयार नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुके यांना विचारणा केली. त्यांनी जय-पराजयचा विचार न करता होकर दिला. याच एका होकाराने फुके यांचे भाग्य फळफळले.

परिणय फुके यांनी पटेलांचे कट्टर समर्थक जैन यांचा धक्कादायक पराभव केला. मंत्रिमंडळाच्या विस्तारात फडणवीस यांनी फुके यांच्या नावाला पसंती दिली. राज्यमंत्री करून त्यांना भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री करण्यात आले होते. त्यांना राजकीय पाठबळ देऊन भाजपने मोदी यांच्याशी थेट पंगा घेणाऱ्या नाना पटोले (Nana Patole) यांना त्यांच्या जिल्ह्यात आणि साकोली मतदारसंघात पराभूत करण्याचे डावपेच आखले होते. दोघांमध्ये लढतही तेवढीच तोडीची झाली होती.

Nana Patole and Dr. Parinay Fuke
Meghna Bordikar On Viral Video : व्हायरल व्हिडिओ,आरोपांची सरबत्ती; भाजप अडचणीत, अखेर बोर्डीकरांनी मौन सोडलं, म्हणाल्या...

भाजपच्या काही उत्साही कार्यकर्त्यांच्या आततायीपणामुळे फुके यांना पराभूत व्हावे लागले. दरम्यान त्यांचा विधान परिषदेचाही कार्यकाळ संपला होता. येथील स्थानिक स्वराज्य संस्थेचा कार्यकाळ संपला आहे. दोन वर्षांपासून प्रशासक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूकही झालेली नाही. महायुतीमुळे या जिल्ह्याचे राजकारण बदलले आहे.

आता प्रफुल पटेल महायुतीत सहभागी झाले आहे. भविष्यात एक जागेवरून वाद टाळण्यासाठी फुके यांना आधीच विधान परिषदेत पाठवण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने विस्तारात मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.

विशेष म्हणजे अलिकडेच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत फुके भाजपच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र स्थानिक नेत्यांच्या विरोधामुळे भाजपला धाडस करता आले नाही. खासदार सुनील मेंढे यांनाच पुन्हा देऊन भाजपने पराभव ओढावून घेतला. तुलनेत नवखे असलेल्या महाविकास आघाडीचे प्रशांत पडोळे यांनी त्यांचा पराभव केला. त्यामुळे नाना पटोले यांचे जिल्ह्यात पुन्हा वर्चस्व वाढले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोलेंच्या वाढत्या वर्चस्वाला कुठेतरी रोखण्यासाठी भाजपकडून फुकेंना बळ देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Nana Patole and Dr. Parinay Fuke
Constitution of India : संविधानाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; काँग्रेसला गाठलं खिंडीत...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com