Constitution, PM Narendra Modi
Constitution, PM Narendra ModiSarkarnama

Constitution of India : संविधानाबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; काँग्रेसला गाठलं खिंडीत...

Constitution of India Home Minister Samvidhaan Hatya Diwas : आणीबाणीला नुकतीच ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याविरोधात संसदेतही ठराव मांडण्यात आला होता.
Published on

New Delhi : लोकसभेच्या निवडणुकीत विरोधी पक्षांनी संविधानाच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपला चांगलेच घेरले होते. त्यानंतर भाजपने आणीबाणीचा मुद्दा पुढे करत काँग्रेसवर पलटवार केला. पण एवढ्यावर न थांबता आता मोदी सरकारने आणीबाणीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

आणीबाणी लावण्यात आल्याचा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून सरकारने जाहीर केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. याबाबतचे राजपत्रही प्रसिध्द करण्यात आले आहे. यामाध्यमातून सरकारने विरोधकांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.

Constitution, PM Narendra Modi
Kangana Ranaut : आधार कार्डशिवाय भेटणार नाही; खासदार कंगनाचा अजब फतवा

अमित शाह यांनी एक्सवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लावून भारतीय लोकशाहीच्या आत्माचा गळा दाबला होता. लाखो लोकांना विनाकारण जेलमध्ये टाकले आणि मीडियावर निर्बंध लादले.

भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस ज्या लोकांनी 1975 च्या आणीबाणीमध्ये अमानवी त्रास सहन केला त्यांच्या योगदानाचे स्मरण करेल, असे शाह यांनी म्हटले आहे.

Constitution, PM Narendra Modi
Arvind Kejriwal : केजरीवालांना जामीन मंजूर, तरीही ‘तिहार’मध्येच राहावे लागणार; काय आहे कारण?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा उद्देश त्या सर्व लोकांचा सन्मान करणे हा आहे. हुकूमशाही सरकारने असंख्य यातना देऊन त्या लोकांनी भारतीय लोकशाहीला जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष केला. संविधान हत्या दिन प्रत्येक भारतीयामध्ये लोकशाहीचे रक्षण आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवेल. जेणेकरून काँग्रेससारखी कोणतीही हुकूमशाही मानसिकता भविष्यात याची पुनरावृत्ती करणार नाही, अशी टीकाही शाह यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com