भंडारा : सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाच्या अर्जित रजा रोखीकरणासाठी साडेतीन हजार रुपयांची लाच (bribe) घेताना येथील माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाच्या अधीक्षक प्रतिभा मेश्राम (Pratibha Meshram) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (ता.२८ जुलै) सायंकाळी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) त्यांच्या कार्यालयातच केली. (ACB Action, Bhandara Latest News)
तक्रारदार हा कनिष्ठ लिपिक असून तो सेवानिवृत्त झाला आहे. त्याच्या अर्जित रजा रोखीकरणासाठी त्याने भंडारा येथील शिक्षण विभागाच्या वेतन पथकाकडे अर्ज सादर केला. मात्र त्याचे रजा रोखीकरण झाले नाही. प्रकरण मंजूर करून कोषागार कार्यालयात पाठविण्यासाठी वेतन पथक अधीक्षक प्रतिभा मेश्राम यांनी साडेतीन हजार रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदाराने याबाबत भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून गुरुवारी सायंकाळी वेतन पथक कार्यालयातच सापळा रचण्यात आला आणि सेवानिवृत्त कनिष्ठ लिपिकाकडून लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, अमित डहारे, सहायक फौजदार संजय कुरंजकर, हवालदार मिथुन चांदेवार, अंकुश गाढवे, चेतन पोटे, विष्णू वरठी, कृणाल कडव, राजकुमार लेंडे, अभिलाषा गजभिये, दिनेश धार्मिक यांनी केली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.