PM Narendra Modi : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो; नेमकी सभा कुणाची ? उपस्थितांना प्रश्न

PM Narendra Modi Yavatmal Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. या सभेच्या माध्यमातून ते जनतेला संबोधित करणार आहेत.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज यवतमाळमधील भारी या परिसरात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून ते जनतेला संबोधित करणार आहेत. या सभेची मोठी तयारी करण्यात आली आहे. दोन लाखांपेक्षा जास्त महिला या सभेला उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी भला मोठा मंडप उभारण्यात आला आहे. या सभेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) काय बोलणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (Marathi News)

यातच पंतप्रधान मोदी यांच्या या सभेतील खुर्च्यांवर काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे फोटो आणि स्कॅनर कोड चिटकवण्यात आलेले दिसून आले. पंतप्रधान मोदींच्या सभेत राहुल गांधींचे फोटो दिसून आल्यामुळे नेमकी सभा मोदींची की राहुल गांधींची ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळात या प्रकाराची मोठी चर्चा रंगली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

PM Narendra Modi
Basavraj Patil News : बसवराज पाटलांचे कालचे शत्रू आज झाले मित्र; राजकीय उलथापालथीचे परिणाम काय?

नेमकं काय घडलं ?

पंतप्रधान मोदी यांची यवतमाळमध्ये (Yavatmal) आज सभा होणार आहे. या सभेला महाराष्ट्रातून हजारो लोकं येणार आहेत. या सभेसाठी अनेक खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत. पण याच खुर्च्यांवर खासदार राहुल गांधी यांचे फोटो आणि स्कॅनर कोड लावण्यात आलेले होते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींची विदर्भात एक सभा पार पडली होती. त्यावेळी त्यांच्या सभेत खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो आणि स्कॅनर कोड लावण्यात आले होते. आता राहुल गांधींच्या कार्यक्रमाला ज्या ठेकदाराने खुर्च्या पुरवल्या. त्याच ठेकेदाराने पंतप्रधान मोदी यांच्या सभेलाही खुर्च्या पुरवल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधींच्या सभेवेळी खुर्च्यांवर लावण्यात आलेले फोटो आणि स्कॅनर कोड तसेच राहिले. दरम्यान, या प्रकाराची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

'त्या' खुर्च्या तातडीने हटवल्या

काँग्रेसच्या मेळाव्याला ज्या खुर्च्या होत्या. त्याच खुर्च्या भाजपच्या सभेला पुरवण्यात आल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. सध्या या प्रकाराचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान, मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधी यांचे फोटो आणि स्कॅनर कोड चिटकण्यात आलेल्या खुर्च्या तातडीने हटवण्यात आल्या असल्याची माहिती आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

PM Narendra Modi
Amit Shah : आदित्य यांना मुख्यमंत्री करायचंय, म्हणून उद्धव ठाकरेंचा आटापीटा; अमित शाहांचे 'मातोश्री'वर प्रहार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com