Swami Govind Giri : 'युद्धबंदी म्हणजे पूर्णविराम नव्हे, हा तर स्वल्पविराम'; 'ऑपरेशन सिंदूर'च्या नावानं स्वामी गोविंदगिरी महाराजांचे डोळे पाणावले

Swami Govind Giri Reacts to PM Modi Operation Sindoor Against Pakistan Based Terrorists : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानस्थित दहशतवादाविरोधात राबलेल्या ऑपरेशन सिंदूरवर स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी बुलढाणा इथं प्रतिक्रिया दिली.
Swami Govind Giri
Swami Govind GiriSarkarnama
Published on
Updated on

Indian Army Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानस्थित नऊ दहशतवादी अड्डे लक्ष्य केले. यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ऑपरेशन सिंदूर', असं नाव दिलं. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये यावरून तीन दिवस युद्धजन्य परिस्थिती होती.

पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारतीय लष्कारनं चोख प्रत्युत्तर दिलं. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशापयशावरून विरोधकांनी केंद्रातील भाजप मोदी सरकारला प्रश्न केले असतानाच, पंतप्रधान मोदींच्या समर्थनात स्वामी गोविंद गिरी महाराज धावून आले आहे. 'विरोधकांनी ही युद्धबंदी म्हणजे, पूर्णविराम समजू नये, तर स्वल्पविराम आहे, हे लक्षात घ्यावे', अशा शब्दात स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी ठणकावले आहे.

स्वामी गोविंद गिरी महाराज बुलढाणा इथल्या चिखली एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावर त्यांनी 'ऑपरेशन सिंदूर' नावाचं कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना (Terrorist) चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राबवलेले ऑपरेशन आणि त्याला दिलेल्या नावानं डोळ्यात अक्षरशः पाणी आले, असे स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी म्हटले.

Swami Govind Giri
Bhushan Gavai mother comment : निवडणुका 'बॅलेट पेपर'वरच व्हाव्यात; सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे न्यायमूर्ती गवई यांच्या आईची ईच्छा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर विश्वास व्यक्त करताना, गेल्या 70 वर्षांपासून आपण मारच खात आलो आहोत. पण आताचे सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आणि चारित्र्याचे आहे. त्यामुळे आपण जिंकत जाणार आहोत. सरकारने दहशतवादाविरोधात लढताना दिलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' नाव वाचून डोळ्यात अक्षरशः पाणी आले, या नावाबद्दल मी नरेंद्र मोदींना विचारणार आहे, असेही स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी म्हटले.

Swami Govind Giri
Brahmos Missile : पाकिस्तानला थरथर कापायला लावणाऱ्या ब्राह्मोसचे जनक कोण?

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. तीन दिवस युद्धजन्य परिस्थितीनंतर युद्धबंदी झाली. ही युद्धबंदी म्हणजे, काही शेवट नव्हे. हा पूर्णविराम नव्हे, तर स्वल्पविराम आहे, हे विरोधकांनी लक्षात घ्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कुटनीती योग्य असून, ती देशाला योग्य मार्गावर नेईल, आणि पाकव्याप्त काश्मीर देखील ताब्यात घेतील, असा विश्वास गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे पाक धार्जिणे आहेत. परकीय लोकांचे हस्तक म्हणून ते काम करतात. त्यांचे बोलवते धनीसुद्धा परकीय आहेत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असल्याचे गोविंद गिरी महाराज यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com