Bhandara : राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेलांनी निभावला दादांच्या दोस्तीचा ‘फर्ज’

NCP On BJP : भंडारा-गोंदिया पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या अभिनंदाचे होर्डिंग्ज
MP Praful Patel Hording in Gondia.
MP Praful Patel Hording in Gondia.Sarkarnama
Published on
Updated on

Assembly Election 2023 : शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपची कास धरलीय. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात भाजप-शिवसेना एकनाथ शिंदे गटासोबत महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी आहे. केंद्रातही राष्ट्रवादीनं ‘एनडीए’मध्ये प्रवेश मिळविला आहे. अशात दादांनी भाजपशी केलेल्या ‘दोस्तीचा फर्ज’ पक्षाचे कार्याध्यक्ष या नात्यानं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी निभावला आहे.

पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं एकहाती सत्ता मिळवत तीन राज्यं काबिज केली आहेत. त्यामुळं सध्या भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. राष्ट्रवादी काँग्रेसही यात मागं नाही. (Posters Of NCP Ajit Pawar Group MP Praful Patel From Gondia Greeting Narendra Modi, Amit Shah & BJP On Winning Assembly Election 2023 Attracted Attention)

MP Praful Patel Hording in Gondia.
Bhandara : डीपीसी निमंत्रकांच्या ‘इनकमिंग-आउटगोइंग’ने महायुतीत होणार रुसवे-फुगवे

तीन राज्यं जिंकल्यानंतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी रविवारीच (ता. 4) ट्विटवर (X) पोस्ट करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं होतं. तीन राज्यांतील भाजपचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाचं यश असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा समर्थक या नात्यानं मोदींचं यासाठी अभिनंदन करतो. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील विजय हा अभूतपूर्व असाच आहे. राष्ट्राप्रती असलेल्या समर्पण भावनेमुळंच मतदारांनी भाजपच्या पदारात विजय टाकल्याचं, खासदार पटेल यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं होतं.

सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांचं अभिनंदन केल्यानंतर सोमवारी (ता. 4) ‘भाईजी’ नावानं सुपरिचित असलेल्या पटेल यांनी भंडारा-गोंदियातून भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं जाहीर अभिनंदन केलं. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या या होर्डिंग्जनं दोन्ही जिल्ह्याचं लक्ष वेधलंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपली भूमिका आधीच स्पष्ट केलीय. बिरसी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपण भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्याशी आधी चर्चा करू व त्यानंतरही काय तो निर्णय घेऊ असं जाहीर केलय. खासदार मेंढे यांनीही याच कार्यक्रमात पटेल यांचा राष्ट्रीय नेते असा उल्लेख करीत आपलीही दिलदारी दाखवून दिलीय. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित दादांनी (Ajit Pawar) मिळविलेल्या मैत्रीपूर्ण हाताचा ‘फर्ज’ पक्षाचे सर्वोच्च राष्ट्रीय नेता म्हणून प्रफुल्ल पटेल निभावत आहेत व त्याला भाजपही तितकाच सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची चर्चा भंडारा-गोंदियातील राजकीय वर्तुळात आहे.

Edited by : Prasannaa Jakate

MP Praful Patel Hording in Gondia.
Bhandara : तेलंगणातील ‘केसीआर’च्या ‘बीआरएस’ची महाराष्ट्रात भ्रूणहत्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com