Maratha Reservation : प्रकाश आंबेडकरांनी दिला मनोज जरांगे-पाटलांना मोलाचा सल्ला

Prakash Ambedkar : शेवटपर्यंत इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार...
Prakash Ambedkar & Manoj Jarange Patil
Prakash Ambedkar & Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi : मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा देत, जरांगे-पाटील यांनी लोकसभेच्या निवडणुकीत उतरावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. आंबेडकर अकोला येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते.

मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे-पाटील यांनी मराठ्यांना येत्या 20 जानेवारीला ‘चलो मुंबई’ची हाक दिली आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावर सरकार वेळकाढू भूमिका घेत आहे.

Prakash Ambedkar & Manoj Jarange Patil
Amravati : प्रकाश आंबेडकर कोणाच्या निमंत्रणाची वाट बघत आहेत का?

सरकारला निवडणुकीची प्रतीक्षा आहे. एकवेळ निवडणूक आली की, मराठा आरक्षणाचा प्रश्न मागे पडणार आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांना आमचे म्हणणे आहे की, त्यांनी लोकसभा निवडणुकीत उतरावे. निवडून आल्यानंतर सभागृहात हा मुद्दा मांडता येईल. मुंबई येथील जरांगे-पाटील यांच्या आंदोलनात सर्व मराठ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित केले. आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणूक जाहीर झाली, तर काँग्रेस भारत जोडो न्याय यात्रा थांबविणार का? एका म्यानात दोन तलवारी कशा राहतील? असेही आंबेडकर म्हणाले. दुसरीकडे काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीकडून दिलेल्या पत्रावरून कोणतीच भूमिका स्पष्ट नाही. वर्षभरापूर्वी वंचित बहुजन आघाडी जिथे होती तिथेच आहे. आपण शेवटपर्यंत इंडिया आघाडीत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जरांगे-पाटील यांना निवडणुकीत ‘वंचित’ पाठिंबा देईल का, यावर बोलताना आंबेडकर म्हणाले की, जरांगे-पाटील यांना भूमिका जाहीर करू द्या, त्यानंतर आम्ही विचार करू. काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरांना आवाहन केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आंबेडकर यांनी थेट भेटावे, असे चव्हाण म्हणाले होते. त्यावर भाष्य करणे आंबेडकर यांनी टाळले.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Prakash Ambedkar & Manoj Jarange Patil
Akola Politics : क्रिकेटच्या मैदानावरही आंबेडकरांनी दाखवून दिले, आम्ही ‘वंचित’ नाही!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com