Mahavikas Aghadi Crisis : महाविकास आघाडी संपलेलीच..! विरोधक संपवण्याचे षडयंत्र सुरू; प्रकाश आंबेडकरांच्या राजकीय बॉम्बने खळबळ

Prakash Ambedkar statement on MVA: वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील राजकीय घडामोडीवर बोलताना, विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक असून, विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
Mahavikas Aghadi latest political developments
Mahavikas Aghadi latest political developmentsSarkarnama
Published on
Updated on

MVA breakup speculation news: राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक दोघांवरही गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला.

सध्या विरोधी पक्षाचे अनेक नेते भाजपमध्ये जाण्यास उत्सुक आहेत आणि महाविकास आघाडी ही केव्हाच संपुष्टात आली आहे, असे म्हणत त्यांनी राज्यात विरोधी पक्ष संपवून संपूर्ण राजकीय व्यवस्था पंगू करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला.

नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीवर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. काँग्रेसचे काही उमेदवार उघडपणे भाजपच्या नेत्यांसोबत बसले, तरी पक्षाकडून कोणतीही कारवाई झाली नाही, असा थेट आरोप त्यांनी केला.

राज्यातील सत्तासमीकरणांवर बोलताना त्यांनी आणखी एक मोठा दावा केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे सहा खासदार फुटले आहेत. मात्र दोन महिन्यांपूर्वी रात्री दोन वाजता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात बैठक झाली होती. त्या बैठकीत नेमकं काय ठरलं, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Mahavikas Aghadi latest political developments
Vishwas Nangare Patil : RSSचं कौतुक विश्वास नांगरे-पाटलांना भोवणार? काँग्रेसने सरकारला थेट विचारले 6 सवाल

दिल्लीत सीजेपीचे सुरू असलेल्या आंदोलनांबाबत बोलताना आंबेडकर यांनी सोशल मीडियावर सुरू झालेल्या नव्या राजकीय चळवळीवरही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, अभिजित दिपके नावाच्या युवकाने सोशल मीडियावर आंदोलन सुरू करताच काही दिवसांतच त्याचे फॉलोअर्स दोन कोटींवर गेले. पण तो विशिष्ट समाजाचा असल्याचे स्पष्ट होताच दिल्लीतील आंदोलनात अपेक्षित गर्दी जमली नाही. आजचा युवक स्वतःच्या प्रश्नांपेक्षा नेता कोण आहे हे पाहून भूमिका घेतो, ही चिंताजनक बाब आहे, असे ते म्हणाले.

Mahavikas Aghadi latest political developments
Devendra Fadnavis on Sanjay Patil : पत्रकारांना मारून टाकेल..! एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराच्या धमकीवर देवाभाऊ संतापले; 'खाकी'तून उत्तर देण्याची तयारी!

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही त्यांनी जोरदार टीका केली. संघ स्वतःला चारित्र्य निर्माण करणारी संघटना म्हणवतो. मात्र नरेंद्र मोदी यांच्यावर झालेले आरोप असताना संघाच्या नेतृत्वाने कधीही सार्वजनिकरित्या खुलासा मागितला नाही. साधी विचारणा करण्याची हिंमतही त्यांनी दाखवली नाही, असा टोला त्यांनी लगावला.

प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे असून महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद, भाजपकडे वाढणारा ओढा आणि आगामी निवडणुकांपूर्वीची रणनीती यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com